पान:महाभारत.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ अध्याय] महाभारत. ८५ चंद्रकेतू । सौबळ गोत्रज दलेंसी युक्तू । धांवत येतां खंडुनी पंथू । काळानळीं भस्मले. ॥ ९८ ॥ शरामागें शरांचे वोघ । लाविले जैसे प्रावृटीं मेघ । विस्मित वीर म्हणती, ‘सुभग । विचार कैसा करावा ? ॥ ९९ ॥ क्षत्रधर्म स्मरोनी मन । पुढे होतां अचुक मरण । मागे सरतां वंशा उणें । मृत्यूच सुख मानिजे.' ॥ १०० ॥ ऐसे वदोनी वीर वाणी । वैरवाळले रणांगणीं । द्रोण वदे स्मितवदनीं । कर्णादिक वीरांतें. ॥ १०१ ॥ ऍकांग वीर हा फाल्गुनी । विचरे जैसा पाशपाणी । धन्य याची जनकजननी । शूरा ऐशा प्रसवली. ॥ १०२ ।। पार्थासमान अस्त्रविद्या । धनुर्भूतांतें होय वंद्या । हस्तलाघव तरी सैद्या । नयनीं तुम्ही पाहतां. ॥ १०३ ॥ आलातचक्रापरी । गरगरां चाप फिरे समरीं । बाण घेतां, सोडितां, कुसरी । लक्ष कोण्हा लक्षेना. ॥ १०४ ॥ चतुर सूत वाजिवेगें । रथ चालवी विचित्र अंगें । वीरसमुद्री एकांग भागें । मत्स्यप्राय तळपतू. ॥ १०५ ॥ रणांगण सन्मुख घायीं । वश्य करी, ऐसा वीर मही । नाहीं, नाहीं, प्रतापी पाहीं । असाध्य विद्या ययाची. ॥ १०६ ॥ स्वैधर्मयुद्ध करितां यासी । निःपात होय क्षत्रियांसी। यया अपाय योजनेसीं । सांगतों सर्वी ऐकिजे. ॥ १०७ ॥ निकड करुनी ऎकमांडी । जीवित्व त्यागोनी, मुरकुंडी । देउनी, दिशा रोधिजे तोंडीं। महा वीर प्रतापें. ॥ १०८ ॥ कोण्ही रथ, कोण्ही सारथी, । चाप कोण्ही, वाजी निगुती । छेदोनी, करितां विरथी, रथी । वश्य होय काळाते. ॥ १०९ ॥ आणीकही अवघड थोर । अभेद कवच मंत्रोच्चार । जे म्यां सांगितले आदरें । पृथानंदा संतोषे; ।। ११० ॥ तेणें सिंचोनियां मंत्रा । कवच बांधिले निजपुत्रा । त्याचा भेद मजवीण सुपुत्रा । कुत नाहीं कोणाते. ॥ १११ ॥ असो; विजेंनी धडकतां अनळ । एकल्या शांत नव्हे अळुमाळ । सहस्रीं लावोनी पाणियुगळ । शांत किजे क्षणार्धे.' ॥ ११२ ।। ऐसी वदोनी दुष्टबुद्धी । मोकलिल्या अस्त्रसिद्धी । जैसी पुनर्वसूची घनवृद्धी । जेवीं वांकुडी न खंडे. ॥ ११३ ॥ अझै आच्छादिजे ऊष्मापती । तैसी निबिड बाणशक्ती । वेष्टीत वीरांचिया पंक्ती । किलकिलाट शब्दांचा. ॥ ११४ ॥ सरसराट सुसाट शब्द । १. पावसाळ्यांत. २. सुखा=कोरडा निष्कारण, फुकट. ३. चढाई करून गेले. ४. उ ५. यम. ६. धनुर्धरांस. ७. सध्या, ह्या प्रसंगीं. ८. आलातचक्र=कोलीत गरगर फिरविले असत जी चक्रासारखी आकृति दिसते तें. ९. शोभतो. १०. स्वधमास अनुसरून (सरळ मार्गाने) यद केले असतां. ११. एकोप्याने, जुटीने. १२. प्राप्त, साध्य, १३. अरण्यांत, १४. पावसाची संततधार. १५. सूर्य.