पान:महाभारत.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ नरहरिकृत [द्रोणपर्व साधक फाल्गुनी वीर पुरता । शरीराच्या खंडुनी चलथा । दशरथां सायक सायक समस्तां । वर्मस्थळी भेदिले. ॥ ८० । कासावीस षड्थी घन । कोसलाधिपती धांविला त्राणें । सौभद्रे सोडुनी बाण घन । सूताश्वरथ भंगिला. ॥ ८१ ॥ खङ्गचर्म वसवोनी करीं । रोखें धांविला अभिमन्यावरी । येरें वर्षांनी बाणधारीं । शिर व्योमा उडविलें. ॥ ८२ ।। प्रवेशोनी पृतनाभारी । करिता जाहला प्रभिन्न मारी । सहस्रशः वीर तया समरीं। कृतांतधामा वोपिले. ॥ ८३ ॥ सेनेमाजी हलकल्लोळ । धरे दाटले शवांचे लोळ । काळ भाविती वीर सकळ । पुँरला आपुला. ॥८४॥ आक्रंदमान समस्त सेना । षड्थी लोटले महात्राणा । पाठी चतुरंग वीर बाणा । सज्जोनी धनु धांविले. ॥ ८५ ॥ रोजें संतप्त होउनी कणें । क्रोधे योध विधिले बाणे । सर्वांग रुधिरें भरलें तेणें । असंभ्रम अभिमन्यु. ॥ ८६ ।। धनुष्य वोढोनी कानाडी । शर सोडिले महाप्रौढी । भेदोनी तनु धराबुडीं । फणीप्राय रिघाले. ।। ८७ ॥ झरझराट रुधिरधारा । जाणों सडा घातला धरा । उभय वीर शोभले सैरा । किंशुकवृक्षासारिखे. ॥ ८८ ॥ परस्परें अस्त्रकडसणी । दाविती निष्ठुरपणीं । न्यूनाधिक भासतां कोण्ही । षड्थी धांवले. ॥ ८९ ॥ शर कर्षांनी एकसरा । ध्वजाश्वसूत ताडिले सैरा । सौभद्रे बाण सोडुनी त्वरा । दशदश तयां अर्पिले.॥ ९० ॥ अद्भुत युद्ध तये संधी । मारिले हटी वीरमांदी । मागधपुत्र काळक्रोधी । यमसदना धाडिला. ॥ ९१ ॥ माघारला भारती वीर । दुःशासनाचा ज्येष्ठकुमर । दौःशासनी विक्रमी शूर । सौभद्राते थडकला. ॥ ९२ ॥ बाण सोडुनी अतिकर्कशा । सारथी वाजी विधिले रोषा । येरू म्हणे. “तुझा तात घोषा । ऐसाची रणीं पातला. ॥ ९३ ।। शेखी पळोनी गेला मागें। न दावितां पुरुषार्थ शीगें । तैसें न करितां, प्रताप अंगें । पाहे माझ्या शरांचा. ॥ ९४ ॥ पाहत असतां घड्थी । तूतें लावीन यमाचे पथीं.' । ऐसे वदोनी बाण शितीं । कृतांतघातें सोडिला. ॥ ९५ । विराजित केतु छेदोनी क्षितीं । पाडुनी, सारथी भरिला क्षती । नव सायक ज्वलितकांती । हृदयीं वर्मी ताडिले. ॥ ९६ ॥ तेणे आली गिरगिरी राया । भ्रमावर्ती विकळ काया । जैसा मद्यपी विसरे देहा । तेवी नरेंद्र सचितू. ॥ ९७ ॥ संजय. १. तलवार आणि ढाल. २. सैन्याच्या गर्दीत. ३. आयुदय संपला. ४. न घाबरलेला, अचळ. ५. आकर्ण, कानापर्यंत. ६. पृथ्वीतळांत, पाताळांत. ७. पळसाचे झाडाप्रमाणे. ८. अस्त्रविद्येची परीक्षा. ९. घोषयात्रेच्या निमित्तानें कौरवांनी पांडवांवर हल्ला केला त्या वेळीं. (मुक्तेश्वर-वनपर्वअध्याय १२, पृष्ठे २६३-२७४ पहा). १०. भोंवळ.