पान:महाबळेश्वर.djvu/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६४ )हवेचा दाब पुष्कळ कमी बसून रुधिर वाहिन्यांतून रक्ताची गती किंचित् तीव्र होते; तेणेंकरून सदा उत्साहवृत्ति राहते. ( जसजसें वरवर जावें, तसें तसें पृथ्वीच्या भोंवतालचें वातावरण पातळ होत जातें, या तत्त्वावर हा सिद्धांत काढला आहे;) तसेंच अशक्तता, वीर्यक्षय, मस्तकाचा हल्लकपणा, निरुत्साह, उद्ग्विनता, व व्याकुलता इत्यादि प्रकार या ठिकाणींं फार कमी होतात.

 आणखी असें आहे कीं येथील हवा तल्लख व अंतर्यामी किंचित शोषक असल्यामुळे या ठिकाणीं पित्त सदैव जागृत असतें. यामुळे अग्निमांद्य मोडून पचनादि व्यापार जोरानें चालतात, अन्नाचा रस यथाक्रम होऊन रक्तशुद्धि व सामर्थ्यवृद्धि हळुहळु होत असते. हवेच्या पित्तकरपचाणें प्रत्यंतर प्रातःकाळीं निजून उठल्याबरोबर उन्हाकडे पाहिलें असतां पिवळे दिसणें व स्वतांस हल्लक वाटणें हेंच होय. यावरून पित्तांशाचा जोर येथें अधिक असावा हें उघड आहे. ह्मणून महाबळेश्वरीं सारक औषधाप्रीत्यर्थ डाक्टरास पैसे भरण्याची गरज नाहींपण ही गोष्ट ज्यांचे कोठे हिरडय़ांस किंवा बाळहिर-