Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५४ )

 श्वरापेक्षांही रमणीय आहे असें सांगतात. त्याप्रमाणेच व-हाड, खानदेश, गुजराथ, राजपुताना, माळवा, नागपूर वगैरे सर्व प्रसिद्ध उष्ण प्रांतांतही उन्हाळ्यांत उन्हाळा न वाटण्यासारखीं ठिकाणें आहेत पण यां पैकीं सर्वच ठिकाणीं महाबळेश्वराइतका पाऊस पडत नाहीं.

 आक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून जून महिना येऊन थडकेपर्यंत बाहेरील लोकांनीं येथें येण्याची शोभा असते. पुढें कोणी छत्रीवर पावसाळा काढणारे लोक येऊन राहिल्यास त्यांचे हाल कुतरे खाणार नाहींत, इतके होतात. आक्टोबरपासून जूनपर्यंत मात्र हवा थंड असून शरीरास आराम करणारी असते. आतां ती निरनिराळे ऋतूंमध्यें कसकशी बदलते याबद्दलच्या विशेष माहितीवरून असें समजलें आहे कीं:-

 आक्टोबर महिन्यांत बहुतकरून येथें थोडा पाऊस पडतो त्यामुळे सकाळीं हवा थोडी सर्द होते, व सायंकाळीं धुकट येऊन वांबाळ पडते. नोवेंबर, डिसेंबर, व जानेवारी, या महिन्यांत हवा शुष्क होते, आणि