पान:महाबळेश्वर.djvu/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५३ )



आपल्या उच्चत्वामुळे पर्जन्योदकवाहक ढगांचें आपल्याकडे आकर्षण करितात, ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. त्यांतही अशा डोंगरावर झाडांची गर्दी असले कारणानें हें आकर्षण मोठ्या झपाटयानें चालून पाऊस पुष्कळ पडतो आणि झाडांचें जीवन जें उदक हें त्यांस यथेच्छ मिळून त्यांची वाढ चांगली होते व त्यांची संतती झपाटयाने वाढत जाते. डोंगर माथ्यावर अतिवृष्टी होत असल्यामुळे व लागलींच खालीं पायथ्याकडे कमी असल्यामुळे तळांतील पिकें माथ्यावर होत नाहींत, हें डोंगरावरील अतिवृष्टीचें सूचक चिन्ह होय.

 यावरून वाचकांच्या लक्षांत आतां ही गोष्ट स्पष्टपणें येईल कीं, थंड हवा उत्पन्न होण्यास उंच डोंगराचा सपाट व ढिसूळ माथा, झाडें आणि पाऊस यांची फार अवश्यकता आहे. महाबळेश्वरास या साऱ्या गोष्टींची पूर्ण अनुकूलता आहे म्हणून येथील हवा या प्रांतांतील इतर ठिकाणांपेक्षां फारच नामी आहे.

 अगदीं उष्ण प्रदेशांतही या तीन कारणामुळे मधून मधून रम्य ठिकाणें दृष्टीस पडतात. म्हैसूर प्रांतांतील निलगिरी हें स्थान महाबळे-