पान:महाबळेश्वर.djvu/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४० )



मुळे इकडें तिकडें पाहण्याची फार उपाधी वाटते, आणि योजिलेलें काम करून केव्हां माघारी येऊन निवाऱ्यांंत शेंकीत बसेन असें होतें. दिवसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे १२ तासांची लांबलचक संध्याकाळच झाली आहे असें वाटतें, यामुळे घरांत उजेड कोठून असणार? त्यांतून घराला रेनकोट घातला असल्यामुळे तर घरांत दिवसाची रात्र होते. धुकें तर घरांत शिरण्यास चोहीकडून वाटा धुंडीत असते आणि झरोक्यांतून शिरकाव होईल तर पहात असतें, यामुळे घरांतील धूर बाहेर जाण्यास अनमान करूं लागतो तेव्हां तो माणसें, त्यांचीं चिरगुटे आणि इमारतीची आंतील बाजू यांना आत्मवत् वर्ण आणून सोडतो. घरांत रात्रंदिवस शेकण्याच्या आगटया किंवा शेगड्या सर्व माणसें घेऊन बसलेली असतात. त्याचा धूर, स्वयंपाकाचा धूर आणि धुके मिळून माणसांना अगदीं बेजार करितात.


---------------