पान:महाबळेश्वर.djvu/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

असे सुद्धा वाटत नाही. खोऱ्यांतून धुकै भरून ते जसजसे वर येऊ लागते तसतसे ते पाहून टेकडयांच्या शिखरापर्यंत टेकड्यांना रुप्याचा मुलामा दिला आहे की काय असे वाटते. धुके जेव्हां दरीतून वर चढूं लागते तेव्हां कोणी विशाल प्राण्याचे धूड नाचत असून भूतचेष्टा चालल्यासारखे दिसते. ऊन पडून सूर्य वर येऊ लागला ह्मणजे पिंजाऱ्याच्या कापसाप्रमाणे त्या धुडाची असंख्य शकले होत जाऊन शेवटी कांहींच नाहीसे होते.

 पुढे पावसाळ्यांत घराबाहेर जाण्याची सोयच नाही, व घरांत राहण्याचीही सोय नसते. चार महिने सूर्यदर्शन तर मुळीच होत नाही. पावसाच्या पाण्याने आकाशाला मोठमोठाली भोंके पडल्यासारखें आकाश गळत असल्यामुळे छत्री किंवा घोंगडयाची खोळ घेऊन बाहेर पडण्याची गोष्ट तर मुळीच मनांतसुद्धा येणार नाही. बाहेर गेलेच तर पानाची केलेली विरली डोंकीवर घेऊन गेले पाहिजे. ते घेतलें की मानेवर कोणी धोंडा ठेविल्यासारखे झाल्यामुळे व चोहोंकडून पावसाचा मार लागत असल्या. .