पान:महाबळेश्वर.djvu/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६ )


करितात. एकंदर २९० पासून ३०० रुपयेपावेतों खर्च होतो. शिवाजीमहाराजांनीं महाबळेश्वरासारखें कृष्णाबाईस उत्पन्न कां दिलें नाहीं तें समजत नाहीं. या कृष्णाबाईंचे देवालयांत मुख्य गंगेच्या बाजूकडील भागांत कोळी लोकांकडे झाडलोट करण्याचें काम असतें. कृष्णाबाईचे कुंडांत जे कोणी यात्रेकरी धर्मादाय पैसा टाकतील तो या कोळ्यांस मिळतो. तसेंच कृष्णाबाईस कोणी नैवेद्य आणिला, तरी तो सुद्धां त्यांस मिळतो; अशी दुसरीकडे कोठेही कोणतेही देवस्थानांत वहिवाट नाहीं. येथें कोळी लोकांचीं घरें ८।१० आहेत.

 येथें दुसरें महाबळेश्वराचें देऊळ आहे, त्याचें सर्व काम काळ्या दगडाचें आहे. यांत दोन भाग आहेत. त्यांपैकीं आंतील गाभा-यांत महाबळेश्वराचें मोठं थोरलें आणि रुद्राक्षाकृती असें स्वयंभू लिंग आहे. याचेवर पांच ठिकाणीं पांच खळगे आहेत, ते नेहमीं पाण्यानें भरलेले असतात. या पांच खळग्यांतून असणा-या कृष्णा, वेण्या, कोयना, गायत्री, आणि सावित्री ह्याच पांच नद्या आहेत. पूर्वी एका दीर्घ शंकेखोर मनुष्यानें ह्या पांच खळग्यांतील