पान:महाबळेश्वर.djvu/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २५ )पाय-या केल्या आहेत आणि तळास फरशी केली आहे. यांत ब्राह्मण व शूद्र लोकांस मात्र स्नान करण्यास हरकत नसते. यापेक्षां कनिष्ठ जातींच्या लोकांस आंत येऊ देत नाहींत. त्यास बाहेर नेऊन पाणी घालतात. याचे शेजारीं दुसरें एक विष्णुकुंड आहे. या देवळामध्ये कृष्णाबाईचा उत्सव फाल्गुन वद्यांत दरसाल होते व तो पांच दिवस चालतो. दररोज पुराण आणि कीर्तनही त्या प्रीत्यर्थ होत असतात. त्याकरितां जावली, वांईकडील ब्राह्मण वगैरे लोक येतात. याचे ब्राह्मणभोजन पांच दिवस होतें. या उत्सवास उत्पन्न सुमारें नव्वद रूपयांचें आहे. पैकीं १६ रूपये श्रीमंत पंतसाहेब संस्थान भोर यांजकडून मिळतात व श्रीमंत प्रतिनिधीसाहेब यांनीं येथील ब्राह्मणांस खरशीगांवचें अग्राहार उत्पन्न रुपये ७४चें दिलें, तें त्यांनीं भाऊबंदकीचे पुष्कळ हिस्सेदार असल्यानें त्यापासून विशेष फायदा होणार नाही, असें जाणून श्रीकृष्णाबाईचे उत्सवास मोठया औदार्यानें लावून दिलें आहे. यांतून खर्च भागत नसल्यामुळे लोकांवर पट्टी बसवून उत्सवाचे बेगमीची तयारी