Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२ )

  कृष्णाबाईचे देवळाच्या पिछाडीस मारुतीचे एक दगडी देऊळ बांधलेलें आहे. हा मारुती श्री रामदास स्वामीनीं स्थापन केलेला आहे असे श्रींचे चरित्रावरून समजतें. त्यांत असें लिहिलें आहे कीं रामदास स्वामी शके १५५६ तारणनाम संवत्सरे या सालांत वैशाख मासीं कृष्णास्नानाकरितां महाबळेश्वरीं राहिले होते. त्यावेळीं ग्रामस्थ मंडळी त्यांचे पूर्णभक्त बनल्यामुळे त्यांची निरंतर सेवा आपले हातून व्हावी ह्मणून त्यांनीं स्वामींस विनंती केली, तेव्हां जातेवेळी स्वामींनीं मंडळींच्या आग्रहास्तव या मारुतीची स्थापना करून त्याची सेवा करून राहणेबद्दल त्यांस अनुग्रह दिला. श्रीकृष्णाबाईंचे देवळानजिक प्रसिद्ध अहिल्याबाई होळकरीण हिनेंही एक उत्तम देवालय बांधून ठेविलें आहे व त्यांस उत्पन्नही करून दिलें आहे. त्यास रुद्रेश्वर असें ह्मणतात. याशिवाय येथें तीर्थे आहेत, तीं रुद्रतीर्थ, चक्रतीर्थ, हंसतीर्थ, पितृमुक्तितीर्थ, अरण्यतीर्थ, मलापकर्षतीर्थ, वगैरे पाहून ही करवीर किंवा काशीक्षेत्राच्या तोडीची पुण्यभूमिका आहे अशी खात्री होते. हल्ली ह्यांत शेवाळ व झाडाचा पाला पडून हीं