पान:महाबळेश्वर.djvu/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६ )

 ऋषीनां राहण्यास अगदीं योग्य आहे. यावरून पूर्वी येथे कोणी तरी तप करणारा ईश्वरी अंश येऊन राहिला असावा असें अनुमान करण्यास हरकत दिसत नाही. उगमस्थान पाहण्यायोग्य आहे.

---------------
ब्रहमारण्य.
---------------

महाबळेश्वरच्या पश्चिमेस देवळापासून तीन चार मैलावर एक विस्तीर्ण झाडी आहे. तिला ब्रह्मारण्य असें म्हणतात, असें नांव देण्याचें कारण, इतकेंच आहे कीं, या ठिकाणीं ब्रह्मा, विष्णु महेश यांनीं, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें यज्ञ केला त्यावेळीं मुख्य अध्वर्यु जो ब्रह्मदेव त्याचे आपले पत्नी बरोबर भांडण होऊन चिरकाल आठवण राहण्याजोगे अनर्थापात झाले म्हणून ब्रह्मदेवाचें नांव यास मिळालें.

हें ब्रह्मारण्य खरोखरीच फार पाहण्यासारखे ठिकाण आहे, महाबळेश्वरावरील इतर ठिकाणच्या देखाव्यांपेक्षां येथील देखावा फारच भव्य आहे. विशेषेकरून रस्त्यानें न जातां पाऊल वाटेनें जो कोणी जाईल,