पान:महाबळेश्वर.djvu/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५ )



आहे. तेथें तें ठिकाण फार पाहण्यासारखे आहे. या संगमास प्रीतिसंगम असें नांव पडलें आहे. सावित्री नदी कृष्णाबाईचे देवळापासून पश्चिमेस ब्रह्मारण्यांतील कडयांत प्रगट होऊन ती पश्चिमवाहिनी झाली आहे आणि वाहत वाहत महाड दासगांव वगैरे गांवावरून जाऊन बाणकोटाजवळ समुद्रास मिळाली आहे. गायित्री नदीचा मात्र येथे कोठेही प्रवाह वाहत असल्याचें दिसत नाही. ती येथें गुप्त होऊन कोंकणांत हरिहरक्षेत्रीं प्रगट झाली आहे आणि लागलींच समुद्रास मिळाली आहे, अशी आख्यायिका आहे. याशिवाय आणखी एक वेदगंगा नांवाची नदी आहे. ती महाबळेश्वर गांवचे उत्तर बाजूस म्हणजे सावित्री व कृष्णा या दोन नद्यांच्यामधील खोऱ्यांत उत्पन्न होऊन पुढें दक्षिणवाहिनी होऊन पूर्वेस जोर गांवानजिक कृष्णेस मिळते. ती ब्रह्मारण्यांतील ब्रह्मंदेवाचे यज्ञाचे वेळीं वेदास शाप झाल्यामुळे उत्पन्न झाली आहे. या नदीचे उगमस्थानाचे ठिकाणी कोरीव गुहा आहेत. त्यांत चार पांच मनुष्यें बसण्याजागी जागा आहे. हें ठिकाण अगदीं निबिड अरण्यांत असल्यामुळे तपस्वी