पान:महाबळेश्वर.djvu/403

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हळू हळू अंतर पडू लागतें; त्याचप्रमाणें जठराग्नी चांगला प्रदीप्त होऊन भूक चरचरीत लागूं लागते, व खाल्लेल्या अन्नाचा शरिरांत चांगला परिपाक होणें व मलोत्सर्ग साफ होऊं लागणें या क्रिया एखाद्या सुप्रकृति मनुष्याप्रमाणें चालू लागतात. तेव्हां रोग्यास अर्थातच हुशारी वाटणें साहजिक आहे. परंतु हा रोग अगदीं समूळ नाहीसा होण्यास हें औषध दोन तीन महिने तरी सारखें घेतलें पाहिजे.

 १८० गोळ्यांच्या १ डब्याची किं. रु. १ σ १२
 ३६० गोळ्यांच्या १ डब्याची किं. रु. ३.

 शिवाय पॅकिंग व पोस्टेजबद्दल हांशील σ५ आणे जास्त पडेल. तीनपेक्षां जास्त डबे मागविल्यास टपालहांशील वगैरेचा कांहींएक चार्ज पडणार नाहीं. अनुपानखर्डा औषधासोबत पाठविला जाईल.

 पत्ता-दत्तात्रय कमळाकर दीक्षित, राहणार महाबळेश्वर.



-------------