पान:महाबळेश्वर.djvu/387

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३५२ )

 येईल. या वेळीं येथें वळवाचे पाऊस, पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून वाऱ्याचीं वावटळे येऊन तिसरे प्रहरीं पडण्यास लागतात. खरा पावसाळा देशावर सुरू झाल्यापासून आठ दिवसांनीं ह्मणजे अर्धामूर्धा जून महिना ढकलतो इतक्यांत चोहींकडून झोडपीत दक्षिण बाजूनें आरंभ करितो आणि सारखा रात्रंदिवस पाणी ओतावयास लागतो. हा चमत्कारही मुक्काम जास्त वाढविल्यास पाहण्यास मिळतो.

------------

 गाड्याचे टपे-महाबळेश्वर, घांडेघर, वांई, जोश्याची विहीर, शिरगांव, वाठार ही घोडे बदलण्याची कंट्राक्टर याचीं ठिकाणें आहेत.

समाप्त.