Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/385

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३५० )

 कारण, मनुष्याच्या शरीरसुखास मुख्य जी हवा ती येथें मनास सदासर्वदा उल्हसित ठेवणारी असल्यामुळे, शिक्षणक्रमाचा धोशा कसा दुधांत साखर घातल्याप्रमाणे मनःपूर्वक चालला असतो. येथील वसाहतीचें सालीना उत्पन्न सरकारी मदत २००० रु० ची धरून बहुतेक खर्चाच्या बेताचेंच आहे.

 येथील व्यवस्था चांगली चालली आहे. हल्लीं येथें यूरोपियन व पार्शी लोकांचे एकंदर बंगले सुमारे ५०|६० आहेत.

नरसरी.

थंडहवेंत होणारीं परदेशचीं झाडें, वनस्पति, बटाटे, सपताळू, निवडुंग आणि ल्बॅकबेरी व इतर मूळ झाडे वगैरे येथे तयार करण्याची खटपट चाललेली असते, ती वांया जात नाहीं. कारण पांचगणीच्या काफीची लंडनच्या दलालांनीं तर चांगलीच तारीफ केली. तसेंच मधुर सुवास असलेली हेलिआट्रोप व मर्टलची फुलें येथें जंगलांत पुष्कळ होतात. ब्रायरचीं फुलें सगळ्या हिंदुस्थानांत दुर्मिळ तीं येथें तयार होतात. वांईहून घाट चढून येणाऱ्या रखरखीनें त्रस्त झालेल्या