पान:महाबळेश्वर.djvu/384

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४९ )


उदार आश्रय देतात. येथील हायस्कूलचा शिक्षणक्रम पाद्री मंडळीच्या कमिटीने चालविला आहे. सन १८७६ मध्ये सुमूहर्तावर याची स्थापना झाल्यावर, १८८० मध्ये मुंबईच्या मुख्य पाद्री साहेबांनी यास थोडे उत्तेजन देऊन सुधारणा केली. तूर्त खाणावळ खाऊन पगारी गोरे व पारशी जातीचे विद्यार्थी या शाळेत पढत असतात. या इंग्रजी शाळेच्या इमारतीला सन १८८४ साली ४०x१८ ची एक कोठडी नवीन बांधून जोडावी लागली त्यास २६०० रू. खर्च आला. रविवारी शाळेस सुटी असल्यामुळे देवाची प्रार्थना करण्यास कित्येक खिस्ती लोक येथेच जमतात. डोंगरमाथ्यावरील उच्च ठिकाणच्या गार हवेत साहेब लोकाच्या मुलांना शिकण्यास ठेवण्याची कायमची एवढीच शाळा आहे. ज्यांना आपली मुले विलायतेस केवळ शिक्षणाकरितां पाठविण्याचे सामर्थ्य नसेल किंवा ती आपल्या डोळ्यापुढे असून वरचेवर भेटावीत असे वाटत असेल त्यांना हे हायस्कूल ह्मणजे एक अलभ्य वस्तूच सांपडली असें ह्मणण्यास हरकत नाही.