पान:महाबळेश्वर.djvu/369

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३४ )

 भरंवसा नसतो. या कारणास्तव या आरोग्यवर्धक ठिकाणींही अनिष्ट व प्राणहारक घाले पडतात. त्याबरोबर टक्कर देण्यास आपण तयार असलें पाहिजे.

 वेण्णातलावाचे उगमाजवळ हिंदूंचें स्मशान आहे त्यांत दहनविधि किंवा भूमिगतविधि करण्याचे संस्कार जातिधर्माप्रमाणें करण्यांत येतात. मुसलमान लोकांची वस्तीच्या ठिकाणीं सोईप्रमाणें दोन ठिकाणीं स्मशानें आहेत. एक सातारा रोडकडील व्ह्यू व्हॅलीच्या लवणांत आहे व दुसरें सुमारें ६ मैलावर लिंगमळा बागेस लागून आहे. या ठिकाणीं जास्त भरणा धावड जातीच्या मुसलमान लोकांचा असल्यामुळे मूठमातीस जाण्याचा त्यांचा समारंभ पेठेतून नजरेस आल्यावांचून राहत नाहीं. प्रेत जमिनींत पुरण्याचा यांचा शिरस्ता आहे.

पारशी लोकांचें स्मशान.

 वेण्णा तलावानजिक पेटिट रोडला लागून आहे. तेथें साहेब लोकांप्रमाणेंच पेटींत घालून हे प्रेत पुरून टाकितात. जातिधर्माप्रमाणें वास्तविक हा