Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



महाबळेश्वर,
---------------

जेथील सुखकारक थंडीमुळे व आरोग्यकारक हवेमुळे ज्यास हवा खाण्याचे ठिकाण असे लोकांनी ठरविले आहे ते महाबळेश्वर गांव उत्तर अक्षांश १८' व पूर्वरेखांश ७३ ४१' यांचे दरम्यान, सह्याद्रि पर्वताच्या साठ मैल लांबीच्या पृथ्वीच्या मानदंडास ज्या पांच शाखा आहेत त्यांपैकी एका शाखेवर आहे. सातारा जिल्ह्यांतील जावली तालुक्यांत अगदी पश्चिम बाजूस सह्याद्रीच्या अतिशय उंच असलेल्या शिखरावर याची वस्ती झालेली आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून या शिखराची उंची ४७१० फूट आहे.