पान:महाबळेश्वर.djvu/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
उपोद्धात.
---------------

देखे महाप्रचंड गिरी । विशाळ पर्वतांचिया दरी ।

जळें तुंबिलीं सरितांसरीं । समुद्रतुल्य अगाध ॥ १ ॥

तेथें आम्र निचोल बेल । कवंट कदंब मधु पिंपळ |

सिरस पलाश विशाळ। न्यग्रोधवृक्ष वाढिन्नले ॥ २॥

ताळ हिंताळ शाळ सरळ । मंदार कांचन तमाळ निर्मळ ।

पिचुमंद देवदार धवळ । अर्जुनवृक्ष अपार ॥ ३ ॥

बदरी श्लेष्मातकी आंवळी । शाल्मली करवंदी जांबुळी ।

चारी वल्लातकी गुग्गुळी। शमी वेरुकळी चिचणिका ॥ ४ ॥

ऐसिया वृक्षांचीं अचाट । डांगें लागलीं घनदाट ।

माजी निर्झरोदकाचे पाट । सैरावैरा धांवती || ५ ||

मस्तके उचलोनि दिनकर । छायें रक्षिला अंधकार ।

माजी श्वापदगणांचे भार । सुखावले सुखवस्ती ॥ ६ ॥

हरिण करी सिंह शार्दूळ । चित्ते चितेळ तरस तरळ ।

रिक्ष रोही गवे मांसाळ । अरण्य सारें माजलें ॥ ७ ॥

--------------------

 महाबळेश्वर हें बरेंच पुरातनचें क्षेत्र असून याची महती पूर्वी मुळींच नव्हती असें नाहीं. या क्षेत्राची पौराणिक माहिती वाचकांस पुढें दिलेलीच आहे