पान:महाबळेश्वर.djvu/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






प्रस्तावना


 या संसारांतल्या आनंदांत सृष्टीच्या अतिरम्य, भव्य व उदात्त स्वरूपाचे प्रेक्षण हा एक महानंद आहे. तो महानंद पूर्णपणें जेथें लाभतो अशी स्थळे थोडीं, व त्या थोडयांच्या मालिकेत महाबळेश्वर हें बरेंच वरचें स्थान व्यापील असें आहे. येथे सृष्टीचें उदार रमणीय स्वरूप दिसतें; हवा थंड परंतु कोरडी असल्यामुळे आरोग्य लाभते; पाणी रुचिकर व गुणकारी असल्यामुळे हुशारी देतें. सारांश, सृष्टिदेवीनें आपला वरदहस्त या स्थानावर ठेविला असल्या कारणाने या स्थानीं येणाराच्या मनास आल्हाद, व शरीरास आरोग्य यांचा लाभ होतो.

 महाबळेश्वरीं दर्शनीय प्रदेश अनेक, तेव्हां त्यांची माहिती देणारे पुस्तक अवश्य आहे, असें मनांत आणून व प्रवासी मंडळीस भासलेली अवश्यकता त्यांच्या उद्गारांवरून जाणून प्रस्तुत पुस्तक तयार केलें आहे. अनेक पुस्तकांतून मिळालेल्या माहेि-