पान:महाबळेश्वर.djvu/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२१ )

 खुर्च्या करण्यासही त्यांनींच प्रथम धडा घालून दिला होता. इ.स. १८४८ मध्यें जेव्हां हा तुरुंग बंद केला तेव्हां पुष्कळ कैद्यांना परवाने देऊन निखालस खुलें करण्यांत आलें होतें. कांहींना मात्र सुपरिंटेंडेंटसाहेबांच्या आफिसांत दर महिन्याचे पहिले तारखेस हजीरी देऊन येथें राहण्यास परवानगी मिळाली होती. परंतु पुनः गुन्ह्यांत सांपडल्यास पुण्याच्या तुरुंगांत तुह्मांस आडकावू अशी त्यांस इशारत दिली होती. प्रस्तुतकाळीं चिनी मनुष्य औषधालासुद्धां येथें राहिला नाही, परंतु त्यांच्या बागांचें काम मात्र पूर्वीप्रमाणें धावड व कुणबी लोकांनी अद्यापि चालविलें आहे.

 वेण्णा सरोवरापासून निघणारा पाण्याचा प्रवाह कड्याखालीं उडी घालीपर्यंत त्याच्या किना-यावर ज्या मोखर जमिनी आहेत त्याच चिनी लोकांपासून धावड व कुणबी लोकांच्या हातीं आल्या आहेत. सर्व पावसाळाभर किनाऱ्याच्या जमिनी या नदीला पूर येऊन तिच्या पाण्यांत बुडून गेल्यामुळे त्यांवरील बांध, पाट, सऱ्या यांचा तर अगदीं नायनाट होऊन ज्ञातो. पुढें आक्टोबर महिन्याची सुरुवात झाल्याबरोबर