पान:महाबळेश्वर.djvu/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११० )



मुख्य कोंकणी पिकें करितात. हीं करण्याच्या जागा इतक्या उताराच्या असतात की, त्यांपैकीं कांहीं ठिकाणीं तर बैलाची मदत घेण्याचेंही फार दुरापास्त असतें. ह्मणून येथें अशा जमिनींत सर्व काम माणसेंच करतात. व अशा जागीं पीकही सपाठीच्या जमिनीवरील पिकापेक्षां बहुतकरून चांगलें येते. या डोंगराच्या पायथ्याशीं जीं गावे आहेत तीं- कृष्णाखोऱ्यांत जोर, गोळेवाडी, धयाट, परतवडी; कोयना खोऱ्यांत बिरवाडी, पार, घोणसपूर, चतुरबेट वगैरे; वेण्या खोऱ्यांत दानवली, माचूतर वगैरे:- त्यांतील लोक डोंगरांतून वाहत येणा-या झ-याच्या पाण्याचे पाट बांधून काढून तें पाणी डोंगराच्या पायथ्यास केलेल्या टप्पेवजा भातखाचरांत सोडितात. आणि त्या पाण्यावर भाताचें पीक करितात, हे पाणी बरेच दिवस टिकण्यासारखे असल्यास भात काढून घेऊन त्याच ठिकाणीं गहूं व सातू करितात. कांहीं खेड्यांना नदीच्या पाटानें किंवा दुस-या रीतीनें पाण्याचा भरपुर पुरवठा होत असल्यास तेथें उसाचेंही पीक करितात. भात, नाचणी, वरी हीं पिकें करावयाची