पान:महाबळेश्वर.djvu/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७५ )



नाहीं म्हटलें तरी चालेल. एकाच कृष्णा नदीचें पाणी परंतु महाबळेश्वरीं त्याची रुचि व पुढे दाहा कोसांवर वांईस गेल्यानंतरची त्याच पाण्याची रुचि या दोहोंमध्ये जमीनअस्मानीचा फरक दिसतो. तो फरक समजण्यास दोन्ही ठिकाणचें पाणी प्रत्यक्ष पिऊन पाहिलें पाहिजे; शब्दांनीं वर्णन करणें व्यर्थ आहे. महाबळेश्वरच्या पाण्यामध्ये स्वच्छता इतकी असते कीं, तें पंचपात्रींत किंवा पेल्यांत घातलें ह्मणजे भांडयाचे अतिसूक्ष्म डाग पाण्याच्या स्वच्छतेमुळे एकदम दिसून येतात. या हवेला तहान फार लागत नाहीं. शिवाय पाण्याचे आंगीं विलक्षण गारठा असतो यामुळे थोडक्या पाण्यानेंच समाधान वाटतें, ही एक येथें मोठी मजा आहे.

 वरील वर्णनावरून येथें पाण्याचें बरेंच दुर्भिक्ष आहे, निदान पाणी मिळण्यास फार अडचणी असतात असें मात्र कोणी समजूं नये अद्वातद्वा खर्च करण्यास मात्र नहरांत पाणी नाहीं, पण अवश्य तितके मिळण्यास अडचण पडत नाहीं. नुकताच पावसाळा संपून हिंवाळ्यास सुरुवात होते अशा