पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदयाला येतो आणि त्यांचा पराभव करतो. उदाहरणार्थ, मुसलमान बादशहांच्या सत्तेविरुद्ध शिवाजी व गुरु गोविंदसिंह दंड ठोकून उभे राहिले आणि त्यांनी मुसलमानी सत्ता धुळीला मिळवली. (अकरावा समुल्लास, पान २८०) मूर्ख कल्पनांमुळे सर्वनाश एक मर्यादा आपण अवश्य काटेकोरपणे पाळली पाहिजे. ती अशी की कोणत्याही परिस्थितीत चुकूनही मद्यमांसाचे सेवन करता कामा नये. राजपुरुषांच्या युद्धाच्या वेळीही सोवळ्या-ओवळ्याचा विचार करून स्वत:चा स्वयंपाक स्वत:च करून खाण्याने नक्कीच पराभव होतो, ही गोष्ट सर्व बुद्धिमंतांनी सांगून ठेवलेली नाही काय ? वस्तुत: क्षत्रियांनी युद्धाच्या वेळी एका हाताने भाकरी खात व पाणी पीत दुसऱ्या हाताने शत्रूवर चढाई करणे आणि घोड्यावर किंवा हत्तीवर बसून अथवा पायउतार होऊन कापाकापी करत विजयी होणे हाच त्यांचा आचार व पराजित होणे हा अनाचार होय. सोवळ्या-ओवळ्याच्या व शिवाशिवीच्या मूर्ख कल्पनांमुळे येथील लोक विरोध करण्याच्या वेळी जेवण्याखाण्याचे सोवळे सांभाळण्यापायी स्वातंत्र्य, आनंद, धन, राज्य,विद्या व पुरुषार्थ यांना पारखे झाले आणि आता सोवळे-ओवळे करीत डोक्याला हात लावून बसले आहेत. काही पदार्थ मिळाले तर ते शिजवून खावेत, अशी इच्छा ते उराशी बाळगून आहेत. परंतु असे स्वस्थ बसून थोडेच काही मिळते ? अशा प्रकारे या सोवळ्या-ओवळ्याने आर्यावर्ताचा सर्वनाश केला आहे. (पान २६८ - २६९) आपसातील यादवीचा राजरोग आर्यांनी आपसात एकत्र खाणे-पिणे करण्यामध्ये कसलाच दोष दिसत नाही. जो पर्यंत आर्य लोकांत एकमत होणार नाही, परस्परांचे लाभहानी व सुखदु:खे एकच आहेत असे मानणार नाहीत, तोपर्यंत त्यांची उन्नती होणे फार कठीण आहे. परंतु केवळ खाणे-पिणे एक झाल्याने सुधारणा होऊ शकत नाही. जोपर्यंत वाईट गोष्टी सोडून दिल्या जात नाहीत व चांगल्या गोष्टी केल्या जात नाहीत तोपर्यंत उन्नतीऐवजी अवनतीच होत जाते. आपसातील फाटाफूट, मतभेद, ब्रह्मचर्याचा अभाव, विद्या न शिकणे व न शिकवणे, महर्षी दयानंद काय म्हणाले ?