पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालविवाह, स्वयंवराच्या विवाहपद्धतीचा त्याग, विषयासक्ती, मिथ्याभाषण, आदी कुलक्षणे, वेदविद्येचा अपप्रचार आदी कुकर्मे या कारणांमुळे आर्यावर्तात विदेशी लोकांची सत्ता प्रस्थापित झाली. जेव्हा भाऊ-भाऊ आपसात भांडतात तेव्हा तिसराच विदेशी येऊन पंच बनतो. पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या महाभारतातील गोष्टी तुम्ही विसरलात काय ? महाभारतीय युद्ध लढणारे सारे वीर आपापल्या वाहनांवर बसूनच खाणे-पिणे करत असत. आपसातील यादवीमुळेच कौरव, पांडव व यादव यांचा सत्यानाश झाला. तोच यादवीचा रोग अजूनपर्यंत भारतीयांच्या मागे लागला आहे. हा राक्षस आमची मानगूट कधी सोडेल की नाही कोण जाणे. की आर्यांना साऱ्या सुखांपासून वंचित करून तो त्यांना दु:खसागरात बुडवून टाकील ? आपल्या गोत्राची हत्या करणाऱ्या, स्वदेशाचा विनाश करणाऱ्या, नीच व दुष्ट दुर्योधनाच्या दुष्ट मार्गाने आर्य लोक आजही चालले आहेत व आपल्या दु:खात भर घालीत आहेत. परमेश्वराने आम्हा आर्यांवर कृपा करावी व हा राजरोग नष्ट करावा. (पान २७० - २७१) सर्व संप्रदायांना आवाहन या देशाची उन्नती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आर्यसमाजाशी सहकार्य करून त्याच्या उद्दिष्टानुसार आचरण करण्यास सुरुवात करा. नाहीतर तुम्ही काहीही करू शकणार नाही. कारण तुम्ही व आम्ही मिळून देशोद्धाराचे काम केले पाहिजे. ज्या देशातील पदार्थांनी तुमची-आमची शरीरे बनली आहेत, आज त्यांचे पालनपोषण होत आहे व यापुढे होणार आहे त्यांची आपण सर्वजण तनमनधनाने व प्रेमाने उन्नती करू या. आर्यावर्ताची उन्नती करण्यास आर्यसमाज जसा समर्थ आहे तसा दुसरा कोणताही समाज, संस्था अथवा संघटना असू शकणार नाही. या समाजाला तुम्ही यथोचित साह्य कराल तर ती फार चांगली गोष्ट होईल. कारण समाजाला भाग्यशाली बनविणे हे समुदायाचे काम असते. ते एकट्यादुकट्याचे काम नसते. (अकरावा समुल्लास, पान ३९८) COCOD ४०) महर्षी दयानंद काय म्हणाले ?