पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यार्थप्रकाशातील वेचे देशाच्या समृद्धीसाठी विदेशप्रवास सर्व सज्जनांनी हे ओळखले पाहिजे की मोह, द्वेष, अन्याय, मिथ्या भाषण इत्यादी दोषांचा त्याग करून निर्वैरता, प्रीती, परोपकार, सज्जनता इत्यादी गुणांचे ग्रहण करणे हाच उत्तम आचार आहे. तसेच हेही ओळखावे की धर्म हा आपल्या आत्म्यात आणि कर्तव्यात निहित असतो. जेव्हा आपण सत्कृत्ये करीत असतो तेव्हा आपल्याला परदेशगमन केल्याने कोणताही दोष किंवा पाप लागत नाही. दुष्कृत्ये केल्यानेच दोष किंवा पाप लागते. अर्थात परदेशी जाणाऱ्याने वेदोक्त धर्माची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि पाखंड मताचे खंडन कसे करावयाचे तेही शिकून घेतले पाहिजे. तसे झाल्यास आपल्याला कोणीही खोटे ठरवू शकणार नाही. देशदेशान्तरी व द्वीपद्वीपान्तरी जाऊन तेथे राज्य व व्यापार केल्याखेरीज आपल्या देशाची उन्नती होणे कधी तरी शक्य आहे काय ? जेव्हा येथील लोक आपल्याच देशात व्यापार करतात आणि परदेशी लोक येथे येऊन व्यापार व राज्य करतात तेव्हा दारिद्म व दु:ख या खेरीज स्थानिक लोकांच्या नशिबी दुसरे काय असणार ? (पान २६८) संपन्नतेचे अनिष्ट परिणाम परमेश्वराच्या या सृष्टीमध्ये अहंकारी, अन्यायी, अविद्वान लोकांचे राज्य फार काळ टिकत नसते. जगाची ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे की, जेव्हा एखाद्या लोकसमूहात किंवा देशात गरजेपेक्षा जास्त धन जमा होते तेव्हा आळस, पुरुषार्थहीनता, ईर्ष्या, द्वेष, विषयासक्ती आणि प्रमाद वाढू लागतात. त्यामुळे देशात विद्या आणि सुशिक्षण नष्ट होऊन मद्यमांससेवन, बाल्यावस्थेत विवाह, स्वैराचार वगैरे सारखे दुर्गुण व व्यसने वाढतात. तसेच जेव्हा युद्धविभाग, युद्धविद्याकौशल्य आणि सैन्य इतके प्रचंड वाढते की, त्याच्यासमोर जगातला कोणताही देश टिकाव धरू शकत नाही, तेव्हा त्या सामर्थ्यशाली देशाच्या लोकांमध्ये पक्षपात, अहंकार यामुळे अन्याय, अत्याचार या गोष्टी वाढतात. हे दोष प्रमाणाबाहेर वाढले की, त्यांच्यात यादवी सुरू होऊन त्यांचा नाश होतो किंवा त्यांच्या बाहेरच्या एखाद्या लहानशा गटातून एक अत्यंत समर्थ पुरुष महर्षी दयानंद काय म्हणाले ?