पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दहावा समुल्लास : आचार व अनाचार विवेचन निवडीची भूमिका वेदादि शास्त्रांच्या साहाय्याने स्वराज्य असतानाचा आचार-विचार तर कळतो. परकीयांची सत्ता असताना काय केले पाहिजे हे कळायला हवे, यासाठी मात्र स्वामी दयानंदांची प्रज्ञा लागते. स्वराज्यात फक्त स्वतःच्या मुक्तीचा विचार करून चालते परंतु परकीयांचे राज्य असताना देशाच्याही मुक्तीचा विचार करायला पाहिजे अशी दयानंदांची स्पष्ट भूमिका आहे. स्वराज्य असताना आपण इतर देशांची माहिती करून घेतली नाही. परदेशप्रवास केला नाही. म्हणून आपल्या देशाच्या नशिबी दारिद्म व पारतंत्र्य आले. आपण सत्कृत्य करत असलो तर परदेशप्रवास केल्याने कोणतेही पाप लागत नाही असे दयानंदांनी स्पष्ट सांगितले आहे. उलट देशोदेशी जाऊन व्यापार केल्याखेरीज देशाची उन्नती होणार नाही असे दयानंद सांगतात. पूर्वी आपला देश संपन्न होता, सामर्थ्यशाली होता तेव्हा संपन्नतेतही सत्कर्म करत राहण्याची दक्षता आपण घेतली नाही. उलट आळस, शिथिलता, स्पर्धा, चैन असे दुर्गुण वाढू लागले. त्यामुळे कमी संख्येच्या परकीयांनीही आपला पराभव केला. सत्कर्म करत समृद्धीसाठी प्रयत्न करणे आणि समृद्धीतही सत्कर्म करत राहणे याचीच राष्ट्रघडणीसाठी गरज असते. शांततेच्या काळातील विधिनिषेध आणि युद्धजन्य परिस्थितीतील विधिनिषेध यांच्यात विवेक करायला पाहिजे, हे आमच्या मूर्खपणामुळे आम्ही विसरलो आणि ते भारताच्या पारंतत्र्याचे कारण आहे असे विधानही दयानंद करतात. राष्ट्रीय एकात्मता होण्यासाठी सर्व जातींनी एकत्र खाणे-पिणे करायला तयार असले पाहिजे. परंतु तेवढी तयारी नसते. परस्परांचे यशापयश, गौरव आणि अपमान एकच आहेत असे सर्व भारतीय मानायला लागले तरच देशाची प्रगती, उन्नती होईल. देशातील व्यक्तींनी तर परस्पर सहकार्य केले पाहिजेच परंतु देशातील सर्व संघटना व समाजांनी परस्पर सहकार्याने काम केले पाहिजे, असे दयानंद म्हणतात. आर्य समाजाला सहकार्य करावे अशा त्यांच्या आवाहनाने या संकलनाचा समारोप करू या. महर्षी दयानंद काय म्हणाले ? ३७