पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यार्थप्रकाशातील वेचे कर्म, उपासना व ज्ञान हे मुक्तीचे साधन जिच्या योगाने पदार्थांच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो तिला विद्यज्ञ असे म्हणतात, आणि जिच्या योगाने तत्त्वस्वरूपाचे ज्ञान होत नाही, भ्रमाने एकात दुसऱ्याची कल्पना होते, तिला अविद्या असे म्हणतात. कर्म व उपासना यांनाही अविद्या असे म्हणतात. याचे कारण असे की हे दोन्ही प्रकार बाह्य व आंतरिक क्रियाविशेषाचे आहेत, ज्ञानविशेषाचे नाहीत. म्हणूनच शुद्ध कर्म व परमेश्वराची उपासना यांच्या मदतीखेरीज कोणीही मृत्यू व दु:ख यातून पार होऊ शकत नाही. अर्थात पवित्र कर्म, पवित्र उपासना आणि पवित्र ज्ञान यांच्या योगानेच मुक्ती मिळते. आणि अपवित्र कर्म, मिथ्या भाषण आदी गोष्टी, पाषाणमूर्ती आदींची उपासना आणि मिथ्या ज्ञान यांच्यामुळे बंध होतो म्हणजे माणूस बंधनात पडतो. (पान २३५) सदाचरणाने मुक्ती परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे, अधर्म, अविद्या, कुसंग, कुसंस्कार, वाईट व्यसने यांच्यापासून दूर राहणे; सत्य भाषण, परोपकार, विद्या, पक्षपातरहित न्याय व धर्म यांची वृद्धी करणे; परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करणे; योगाभ्यास करणे, विद्या शिकणे व शिकवणे; धर्माने पुरुषार्थ करून ज्ञानाची उन्नती करणे; सर्वात उत्तम साधनांचा वापर करणे; आणि जे काही करावयाचे ते सर्व पक्षपातरहित न्यायधर्मानुसार करणे इत्यादी साधनांनी मुक्ती मिळते आणि याहून विपरीत ईश्वराची आज्ञा भंग करणे वगैरे कामांच्या योगाने बंध होतो. (पान २३९) दुःखापासून सुटका मिळवणे हा पुरुषार्थ शारीरिक दुःखे, इतर प्राण्यांपासून उत्पन्न होणारी दुःखे व अतिवृष्टी, अत्यंत उन्हाळा, अत्यंत थंडी, अनावृष्टी, मन व इंद्रिये यांची चंचलता यांतून निर्माण होणारी दुःखे, या त्रिविध दुःखांपासून सुटका करून घेऊन मुक्ती मिळविणे हा अत्यंत पुरुषार्थ आहे. (पान २६०) COCOO महर्षी दयानंद काय म्हणाले ?