पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यार्थप्रकाशातील वेचे सृष्टीचा प्रारंभ ___ ज्याप्रमाणे दिवसापूर्वी रात्र आणि रात्रीपूर्वी दिवस, तसेच दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस हे चक्र चालू असते, त्याचप्रमाणे सृष्टीपूर्वी प्रलय व प्रलयापूर्वी सृष्टी, तसेच सृष्टीनंतर प्रलय व प्रलयानंतर सृष्टी हे चक्र अनादी काळापासून चालत आले आहे. त्याला आदी किंवा अंत नाही. परंतु जसा दिवसाचा किंवा रात्रीचा आरंभ व अंत पाहायला मिळतो तसाच सृष्टी आणि प्रलय यांचा आदी व अंत होत असतो. कारण जसे परमेश्वर, जीव, जगाचे कारण हे तीन पदार्थ स्वरूपतः अनादी आहेत, तसेच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय हेही प्रवाहरूपाने अनादी आहेत. नदीचा प्रवाह डोळ्यांना दिसतो, कधी तो सुकून जातो, कधी दिसतच नाही. तो पावसाळ्यात पुन्हा दिसू लागतो व उन्हाळ्यात दिसेनासा होतो. अशा या व्यवहाराला प्रवाहरूप समजावे. जसे परमेश्वराचे गुण, कर्म, स्वभाव अनादी आहेत. तसेच त्याच्याद्वारे जगाची उत्पत्ती, स्थिती व लय घडून येणे हेही अनादी आहे. ज्याप्रमाणे ईश्वराचे गुण, कर्म व स्वभाव यांना आरंभ व अंत नसतो त्याचप्रमाणे त्याच्या कर्तव्यकर्माचाही प्रारंभ व अंत नसतो. (पान २२५) आर्यावर्ताची सद्य:स्थिती आता दुर्दैवाने आर्यांमधील आळस, प्रमाद व आपसातील यादवी या दोषांमुळे इतर देशांवर राज्य करण्याची गोष्ट तर दूरच राहिली; पण खुद्द आर्यावर्तातही आर्यांचे अखंड, स्वतंत्र, स्वाधीन, निर्भय राज्य राहिले नाही. जे काही उरले आहे ते विदेशी लोकांकडून पादाक्रांत केले जात आहे. काही थोडे राजे स्वतंत्र आहेत. जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा देशवासियांना अनेक प्रकारची दु:खे भोगावी लागतात. कोणी काहीही म्हटले तरी स्वदेशी राज्य असणे ही गोष्ट सर्वश्रेष्ठ व उत्तम असते. धार्मिक पूर्वग्रहापासून अलिप्त, आपले व परके यांच्या बाबतीत पक्षपात न करणारे, प्रजेवर मातापित्यांप्रमाणे कृपा, न्याय व दया करणारे; अशा परकीय लोकांचे राज्यही पूर्णपणे सुखदायक नाही. परंतु वेगवेगळ्या भाषा, भिन्न प्रकारचे शिक्षण आणि भिन्न व्यवहार यांच्यामुळे होणारा विरोध नाहीसा होणे अत्यंत कठिण आहे. तो नाहीसा महर्षी दयानंद काय म्हणाले ?