पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र व प्रजापती या तेहतीसांमध्ये त्या त्या ठिकाणी वर्णन केलेले गुण असल्यामुळे त्यांना देव असे म्हणतात. त्यांचा स्वामी व सर्वांहून श्रेष्ठ असा जो चौतीसावा परमात्मा तोच उपास्यदेव आहे. (पान १७६ - १७७) मूर्तिपूजा का नको? ज्याअर्थी परमेश्वर निराकार, सर्वव्यापक आहे त्याअर्थी त्याची मूर्ती बनूच शकत नाही. आणि जर केवळ मूर्तीच्या दर्शनाने परमेश्वराचे स्मरण होत असेल तर परमेश्वराने निर्माण केलेली पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती वगैरे वस्तूंच्या अद्भुत रचना पाहून ईश्वराचे स्मरण होणार नाही काय ? ज्या डोंगरातून माणूस मूर्ती घडवितो ते डोंगर व पृथ्वी याच परमेश्वराने बनवलेल्या महामूर्ती आहेत त्या पाहून परमेश्वराचे स्मरण होऊ शकणार नाही काय ? शिवाय मूर्ती पाहिल्यानंतर परमेश्वराचे स्मरण होते असे जे तुम्ही म्हणता ते पूर्णपणे खोटे आहे. कारण जेव्हा मूर्ती समोर नसेल तेव्हा परमेश्वराचे स्मरण न झाल्याने माणूस एकान्त मिळताच चोरी, जारी वगैरे दुष्कृत्ये करण्यास प्रवृत्त होईल. समोर मूर्ती नसल्यामुळे आपल्याला कोणी पाहात नाही असे त्याला वाटेल आणि तो वाटेल ते कुकर्म करेल. परंतु परमेश्वर नेहमीच सर्व काही हल सत्कर्मे व कुकर्मे हह्न पाहात असतो. जो कोणी पाषाणादिकांच्या मूर्तीवर श्रद्धा न ठेवता सर्वदा सर्वव्यापक, सर्वान्तर्यामी, न्यायकारी परमात्मा सर्वत्र आहे असे जाणतो व मानतो तो हे ओळखतो की, परमेश्वर सगळ्यांची बरी-वाईट कृत्ये सदैव पाहात असतो; आणि एक क्षणही आपण परमात्म्यापासून दूर राहू शकत नाही. म्हणून कुकर्म करण्याची गोष्ट दूरच राहिली, तसे काही करण्याचा वाईट विचारही तो मनात आणू शकत नाही. ___ (अकरावा समुल्लास पान ३१४) सजीव देवांची पूजा हवी कोणत्याही प्रकारची मूर्तिपूजा करू नये. परंतु पाच सजीव देवांची पूजा करणे, त्यांचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे. पंचदेवपूजा किंवा पंचायतन पूजा शब्दांचा अर्थ फार चांगला आहे. पहिली मूर्तिमती, पूजनीय देवता माता आहे. सर्व मुला-मुलींनी तन-मन-धनाने महर्षी दयानंद काय म्हणाले ? २७