पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोठमोठ्या नौका चालविणारे या दोघांना सोयीची होईल अशी व्यवस्था करावी. देशदेशांतरी व द्वीपद्वीपांतरी नौका घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रजेचे सर्वप्रकारे उत्तम रक्षण होईल आणि त्यांना कोठेही कोणाकडूनही त्रास होणार नाही असा बंदोबस्त राजाने करावा. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की या देशात पूर्वी जहाजे नव्हती व आपले पूर्वज परदेशगमन करीत नव्हते असे जे लोक म्हणतात ते खोटे आहेत. परदेशात परद्वीपात नौकेने प्रवास करणाऱ्या आपल्या प्रजेचे पूर्ण रक्षण राजाने करावे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये. (पान १७४) न्यायव्यवस्था ज्या अपराधाबद्दल सामान्य माणसाला एक पैसा दंड होतो त्याच अपराधाबद्दल राजाला हजार पैसे दंड केला जावा. याचा अर्थ असा की सामान्य माणसाच्या हजारपट शिक्षा राजाला झाली पाहिजे. मंत्री किंवा दिवाण यांना आठशे पट, त्याहून खालच्या पातळीवरील व्यक्तींना सातशे पट, त्याहून खालच्या दर्जाच्या लोकांना सहाशे पट, या प्रमाणे ज्याची जी योग्यता असेल तिच्याप्रमाणे त्याला कमी किंवा जास्त शिक्षा करण्यात यावी. सर्वांत खालचा कर्मचारी म्हणजे पट्टेवाला होय. त्याला सामान्य माणसापेक्षा किमान आठपट शिक्षा झाली पाहिजे. याचे कारण असे की सामान्य प्रजाजनापेक्षा राजपुरुषाला म्हणजे सरकारी नोकराला जास्त शिक्षा झाली नाही तर हे राजपुरुष प्रजाजनांचा नाश करून टाकतील. सिंहाला ताब्यात ठेवायचे असेल तर त्याला कडक शिक्षा करावी लागते. परंतु शेळीला थोडीशी शिक्षा पुरते. तसेच हे आहे. म्हणून राजापासून तळागळाच्या नोकरापर्यंतच्या राजपुरुषांना त्यांच्या अपराधाबद्दल सामान्य जनतेपेक्षा जास्त शिक्षा करण्यात आली पाहिजे. (पान १७१) राजनीतीचे आधार जे-जे नियम राजा व प्रजा यांच्यासाठी सुखकारक व धर्मयुक्त समजले जातील असे नियम पूर्ण विद्वानांच्या राजसभेने तयार करावेत. मात्र ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की शक्यतोवर बालपणी विवाह होता कामा नयेत. तरुणपणीही पतिपत्नींच्या संमतीशिवाय विवाह होऊ देऊ नयेत. ब्रह्मचर्याचे यथावत् पालन झाले पाहिजे. व्यभिचार महर्षी दयानंद काय म्हणाले ?