पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाही तर त्यांचे पाहून इतर राजपुरुषही तशीच दुष्कृत्ये करतील. परंतु त्यांना शिक्षा दिल्यास इतर लोक लाचलुचपतीपासून दूर राहतील. राजपुरुषांचा योगक्षेम उत्तम प्रकारे चालेल व ते बऱ्यापैकी धनाढ्यही बनू शकतील एवढे धन अथवा भूमी शासनातर्फे त्यांना दिली जावी. राजपुरुष वृद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांचा निम्मा पगार जिवंत असेपर्यंत मिळावा. त्यांच्या निधनानंतर तो बंद व्हावा. मृत राजपुरुषांची मुले लहान असतील व पत्नी जिवंत असेल तर त्या सर्वांच्या पोटापाण्याची योग्य ती व्यवस्था शासनाकडून व्हावी. (पान १५१-१५२) करपद्धती व्यापारी व कारागीर यांना सोने व चांदीच्या रूपाने जेवढा नफा मिळत असेल त्याचा पन्नासावा भाग कर म्हणून राजाने घ्यावा. तांदूळ वगैरे धान्याचा सहावा, आठवा किंवा बारावा भाग घ्यावा. शेतकऱ्यांकडून धान्यरूपाने कर न घेता तो पैशाच्या रूपात घ्यावयाचा असेल तर तो अशा प्रकारे घ्यावा की शेतकऱ्यांना खाण्याची ददात पडणार नाही अथवा ते निर्धन बनून दु:खी होणार नाहीत. कारण प्रजा धनाढ्य, आरोग्यसंपन्न व खाऊनपिऊन सुखी असेल तरच राजाची भरभराट होते. राजाने प्रजेला आपल्या मुलाबाळांप्रमाणे सुखी ठेवावे व प्रजेने राजाला व राजपुरुषांना पित्याप्रमाणे मानावे. शेतकरी वगैरे श्रम करणारे लोक राजांचे राजे असतात आणि राजा त्यांचा रक्षणकर्ता असतो, ही वस्तुस्थिती आहे. प्रजाच नसेल तर राजा कुणाचा ? आणि राजा नसेल तर प्रजा कुणाची ? राजा आणि प्रजा हे दोघेही आपापल्या कामाच्या बाबतीत स्वतंत्र आणि परस्परांशी सहकार्य करण्याची गरज ज्या कामांमध्ये असते त्यांच्या बाबतीत ते एकमेकांवर अवलंबून असतात. प्रजेच्या सर्वसाधारण संमतीच्या विरुद्ध राजाने किंवा राजपुरुषांनी वागू नये. राजाच्या आज्ञेविरुद्ध प्रजेने किंवा राजपुरुषांनी वागू नये. (पान १६२ - १६३) करदात्यांचे रक्षण लांब मार्गामध्ये ज्या प्रमाणात समुद्राच्या खाड्या, नद्या अथवा महानद्या येत असतील व देश जेवढा मोठा असेल त्या प्रमाणात नाकेबंदी करून कर बसवावा. महासमुद्रात अशी नाकी बसवता येणार नाहीत. परंतु त्याबाबतीत राजा आणि समुद्रावर महर्षी दयानंद काय म्हणाले ?