पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व बहुविवाह बंद झाले पाहिजेत. या योगे शरीर व आत्म्याचे सामर्थ्य वाढत राहते. जर कोणी केवळ आत्म्याचे बळ म्हणजे विद्या व ज्ञान वृद्धिंगत करील आणि शारीरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष करील तर त्याचा काही उपयोग नाही. कारण एकटा बलवान मनुष्य शेकडो ज्ञानी व विद्वान् लोकांना जिंकू शकतो. या उलट जर फक्त शारीरिक बळच वाढविले आणि आत्म्याचे बळ वाढविले नाही तर विद्येच्या अभावी उत्तम राज्यकारभार चालू शकत नाही. राज्यव्यवस्था नीट नसेल तर सगळे जण आपापसात भांडून नष्ट होऊन जातील. म्हणून नेहमी शरीराचे व आत्म्याचे बळ वाढवीत राहिले पाहिजे. व्यभिचार व अति विषयासक्ती यांच्यासारखी बळ व बुद्धीचा नाश करणारी दुसरी गोष्ट नाही. विशेषत: क्षत्रियांनी सुदृढ व सबळ असले पाहिजे. कारण तेच विषयासक्त झाले तर राज्यधर्मच नष्ट होईल. हे लक्षात ठेवावे की 'यथा राजा तथा प्रजा' म्हणजे जसा राजा असेल तशीच त्याची प्रजा असते. म्हणून राजा व राजपुरुष यांनी कधीही दुराचार करू नये. त्यांनी सदैव धर्माने व न्यायाने वागून सर्वांना आदर्श घालून द्यावा. (पान १७५) महर्षी दयानंद काय म्हणाले ?