पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यामुळेच शासनव्यवस्था, सरकारी नोकर व न्यायाधीश यांच्या बाबतीत घेण्याची दक्षता, करपद्धती, करदात्यांचे रक्षण, अधिकारी लोकांना देण्याच्या शिक्षणासंबंधी धोरण आणि राजनीतीचे आधार या सगळ्या बाबतचे विवेचन समाजाच्या अभ्युदयासाठी म्हणजेच धर्मसंस्थापनेसाठी दयानंदांनी केले आहे. सत्यार्थप्रकाशातील वेचे शासनव्यवस्था महाविद्वानांना विद्यासभेचे अधिकारी बनवावे. धार्मिक विद्वानांना धर्मसभेचे अधिकारी बनवावे, व प्रशंसनीय धार्मिक पुरुषांना राजसभेचे सभासद बनवावे; आणि त्यामध्ये सर्वोत्तम गुणांनी, कर्माने व स्वभावाने युक्त महान् पुरुष असेल तर त्याला राजसभेचा सभापती मानून सर्व प्रकारे सर्वांनी आपली उन्नती करावी. तिन्ही सभांच्या संमतीने राजनीतीचे उत्तम नियम करावेत आणि त्या नियमांनुसार सर्व लोकांनी वागावे. सर्वांच्या संमतीने सार्वजनिक हिताची कामे करावीत. माणसाने सर्वांचे हित करण्यासाठी 'परतंत्र' असावे आणि स्वत:च्या कामाच्या बाबतीत ‘स्वतंत्र' राहावे. (पान १३४) कुणा एका विशिष्ट व्यक्तीला स्वतंत्र राज्याचा अधिकार देता कामा नये. परंतु सभापती असणाऱ्या राजाच्या आधीन सभा असावी. सभेच्या आधीन राजाने राहावे, राजा व सभा यांनी प्रजेच्या आधीन राहावे आणि प्रजेने राजसभेच्या आधीन राहावे. (पान १३३) दक्षता जे राजपुरुष म्हणजे न्यायाधीश अन्यायाने वादी व प्रतिवादी यांच्याकडून गुप्त रितीने लाच घेतात व पक्षपात करून अन्याय करतात, त्यांचे सर्वस्व हरण करून त्यांना यथायोग्य शिक्षा करावी. अशा लाचखाऊ सरकारी नोकरांना शिक्षा दिली गेली महर्षी दयानंद काय म्हणाले ?