पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्तन ठेवणे तर आश्रमांमध्ये अवघड असते. संन्यासी जसा सर्वतोमुक्त होऊन जगावर उपकार करतो तसा इतर आश्रमातील मनुष्य करू शकत नाही. कारण संन्याशाला सत्यविद्यांच्या योगे पदार्थांच्या विज्ञानाची उन्नती करण्यास जेवढा वेळ मिळतो तितका इतर आश्रमातील व्यक्तीला मिळू शकत नाही. परंतु जो ब्रह्मचर्याश्रमातून संन्यासी होऊन जगाला सत्याचे शिक्षण देतो व त्याद्वारे जगाची जेवढी उन्नती घडवून आणू शकतो तेवढी गृहस्थ अथवा वानप्रस्थ या आश्रमांतून संन्यासाश्रमात प्रविष्ट होणारा करू शकत नाही. (पान १२६ - १२७) संन्याशांची कर्तव्ये __ वैदिक कर्मे ही धर्मयुक्त सत्य कर्मे असतात. ती संन्याशांनीही अवश्य केली पाहिजेत. भोजन, आच्छादन वगैरे कर्मे ते टाळू शकतात काय ? जर ही कर्मे सुटू शकत नसतील तर उत्तम कर्मे सोडल्याने ते पतित व पापभागी होणार नाहीत काय ? हे संन्यासी गृहस्थांकडून अन्नवस्त्रादी घेतात त्यामुळे धर्मोपदेशाच्या रूपाने त्यांच्या त्या उपकाराची परतफेड करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. ते कर्तव्य त्यांनी केले नाही तर ते महापापी होणार नाहीत काय ? ज्या डोळ्यांनी दिसत नाही व कानांनी ऐकू येत नाही ते डोळे व कान असून नसल्यासारखेच असतात. त्याचप्रमाणे जे संन्यासी सत्योपदेश आणि वेदादी सत्यशास्त्रांचा विचार, प्रचार करीत नाहीत, तेही या जगात व्यर्थ, भाररूप आहेत. (पान १२८) (१८ महर्षी दयानंद काय म्हणाले ?