पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाचवा समुल्लास : वानप्रस्थ आणि संन्यास निवडीची भूमिका पाचव्या समुल्लासामध्ये गृहस्थाश्रमानंतरच्या वानप्रस्थाश्रमाचा आणि संन्यासाश्रमाचा उल्लेख केला आहे. मनुस्मृतीतील धर्माची दहा लक्षणे चारही आश्रमांतल्या लोकांसाठी आहेत. परंतु संन्याशांसाठी अकरावे लक्षण सांगितले आहे ते म्हणजे वरील दहा लक्षणांचे स्वतः आचरण करून ते इतरांनाही समजावून सांगणे व त्यांना आचरण करण्यास सांगणे. दयानंदांच्या दृष्टीने भौतिक ज्ञान शिकवण्याचे काम ब्रह्मचारी, गृहस्थ व वानप्रस्थी यांचे आहे तर धर्म शिकवण्याचे (त्यामध्ये आध्यात्मिक ज्ञानही आले) काम संन्याशांचे आहे. शरीरामध्ये जे डोक्याचे स्थान आहे ते आश्रमांमध्ये संन्यासाश्रमाचे आहे, असे संन्याशांच्या कामाचे महत्त्व जसे दयानंदांनी सांगितले तसेच जे संन्यासी सत्योपदेश व सत्यशास्त्रांचा प्रचार करत नाहीत ते या जगात भाररूप आहेत असेही दयानंद म्हणतात. सत्यार्थप्रकाशातील वेचे आश्रमांचा क्रम मनुष्यांनी ब्रह्मचर्याश्रम समाप्त केल्यावर गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. तो संपल्यावर वानप्रस्थाश्रम स्वीकारावा व नंतर संन्यास घ्यावा, हे क्रमानुसार आश्रमाचे विधान आहे. (पान ११८) १६ महर्षी दयानंद काय म्हणाले ?