पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसऱ्या देवयज्ञामध्ये अग्निहोत्र, विद्वानांचा सत्संग, सेवा, पावित्र्य, दिव्य गुण अंगी बाणविणे, दातृत्व, विद्येची वृद्धी करणे यांचा समावेश होतो. हे दोन्ही यज्ञ दररोज सकाळी व संध्याकाळी करायचे असतात. (पान ९१-९२) तिसरा पितृयज्ञ. त्यामधे पितरांची सेवा करण्याचा समावेश होतो. विद्वान् असे देव, अध्ययन-अध्यापन करणारे ऋषी, माता, पिता आदी वयोवृद्ध, ज्ञानी आणि परमयोगी म्हणजे पितर होत. त्यांची सेवा करणे म्हणजे पितृयज्ञ होय. (पान ९२-९३) चौथा यज्ञ म्हणजे भूतयज्ञ किंवा वैश्वदेव. पाकशाळेमध्ये भोजनासाठी जे जे पदार्थ तयार झाले असतील त्यांचे सहा भाग जमिनीवर ठेवावेत. ते भाग कुत्री, पापी, चांडाळ, पापरोगी, कावळे व किडे इत्यादींना खाऊ घालावेत. पाकशाळेत अदृश्य जीवांची नकळत जी हत्या होते तिचे परिमार्जन किडामुंग्यांना अन्न खाऊ घातल्याने होते. (पान ९४-९५) पाचवी अतिथीसेवा. ज्याच्या येण्याची तिथी म्हणजे दिवस, वेळ निश्चित नसते त्याला अतिथी असे म्हणतात. तो केव्हाही अकस्मात येतो. धर्मप्रचारक, सत्योपदेशक, सर्वांवर उपकार करण्यासाठी सर्वत्र हिंडणारा, पूर्ण विद्वान, परमयोगी, संन्यासी असा जो पुरुष अकस्मात् गृहस्थाच्या घरी येतो त्याला अतिथी असे म्हणतात. त्याला सत्कारपूर्वक आसनावर बसवावे. त्याला उत्तमोत्तम पदार्थ खाण्यास व पिण्यास द्यावेत आणि त्याची सेवा-शुश्रूषा करून त्याला प्रसन्न करावे. त्यानंतर त्यांचेकडून ज्ञानविज्ञानाच्या गोष्टीतून धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची प्राप्ती होईल अशा उपदेशाचे श्रवण करावे व त्यानुसार आपल्या आचरणातही बदल करावा. (पान ९५-९६) OcDEO महर्षी दयानंद काय म्हणाले ? १५)