पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यार्थप्रकाशातील वेचे समावर्तन यथायोग्य ब्रह्मचर्याचे पालन करून, आचार्यांच्या सांगण्याप्रमाणे वागून, धर्मपूर्वक चार, तीन, दोन किंवा एका वेदाचे सांगोपांग अध्ययन करून, जो पूर्ण ब्रह्मचारी राहिला असेल, म्हणजे ज्याचे ब्रह्मचर्य खंडित झाले नसेल अशा पुरुषाने अथवा स्त्रीने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. (पान ७२) स्वयंवर विवाहाचा निर्णय मुलाने व मुलीने घ्यावा हे चांगले. आईवडिलांच्या मनात आपल्या मुलामुलींचा विवाह करण्याचा विचार आला असेल तरीही त्यांनी मुलाची किंवा मुलीची संमती घेतल्याशिवाय विवाह ठरवू नये. कारण वधुवरांनी एकमेकांना पसंत केल्यावर विवाह झाल्यास त्यांच्यात फारसा विरोध निर्माण होत नाही; आणि मुलेही चांगली निपजतात. मनाविरुद्ध केलेल्या विवाहाने नेहमीच दु:ख होत राहते. विवाहामध्ये मुख्य संबंध वधू व वर यांचा असतो; आईबापांचा नव्हे. कारण ती दोघे एकमेकांवर अनुरक्त असतील तर त्यांनाच सुख होते; आणि त्यांच्यात विरोध असल्यास त्यांनाच दु:ख भोगावे लागते. (पान ७७) जो पर्यंत अशा प्रकारे सर्व ऋषी मुनी, राजे महाराजे, आर्य लोक ब्रह्मचर्य पालन करून, विद्याध्ययन पूर्ण केल्यावरच स्वयंवर पद्धतीने विवाह करत असत तोपर्यंत या देशाची सतत उन्नती होत होती. परंतु जेव्हापासून ब्रह्मचर्याकडे दुर्लक्ष होऊ लागले, विद्याभ्यास थांबला आणि पराधीन अशा बाल्यावस्थेत आईबापांच्या इच्छेप्रमाणे विवाह होऊ लागले तेव्हापासून या आर्यावर्त देशाची अवनती होऊ लागली. म्हणून ही वाईट चाल बंद करून सज्जनांनी पूर्वीप्रमाणे स्वयंवर विवाहाची प्रथा सुरू केली पाहिजे. आता वर्णानुसार विवाह झाले पाहिजेत आणि वर्णव्यवस्थाही गुण-कर्म-स्वभावानुसार असली पाहिजे. (पान ७९) माणसांच्या जाती माणसांनी केल्या आहेत मनुष्य, पशु-पक्षी, वृक्ष, जलचर इत्यादी जाती ईश्वराने निर्मिलेल्या आहेत. पशृंमध्ये महर्षी दयानंद काय म्हणाले ?