पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ते चार नव्हे असंख्य आहेत असेच म्हटले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा स्वधर्म जसा स्वतंत्र असतो तसा प्रत्येकाचा वर्णही स्वतंत्र असतो. पूर्वीच्या चार वर्णांचे मिळण प्रत्येकाच्या नव्या वर्णात असते असेच आता म्हटले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा विचार स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती असाच आता केला पाहिजे. अमुक जातीचा किंवा अमुक वर्णाचा असे व्यक्तीचे वर्णन आता कालबाह्य मानले पाहिजे. सत्यार्थप्रकाशातील वेचे विद्या हेच खरे भूषण ___ मुलांना उत्तम विद्या, शिक्षण, गुण, कर्म आणि स्वभावरूपी आभूषण घालणे हे माता, पिता, आचार्य व नातेवाईक यांचे मुख्य काम आहे. सोने, चांदी, माणिक, मोती, प्रवाळ वगैरे रत्नांचे दागिने घातल्याने माणसाचा आत्मा कधीही सुभूषित होऊ शकत नाही. कारण आभूषणे धारण केल्याने केवळ देहाभिमान व विषयासक्ती वाढते; आणि चोरांची भीती व मृत्यूचीही शक्यता असते. आपण जगात असे पाहतो की अंगावर दागिने घातल्यामुळे दुष्टांच्या हातून मुलादींचा मृत्यूही होतो. ज्या पुरुषांचे मन विद्येच्या विकासात मग्न असते, जे सच्छील व सुस्वभावी असतात, जे सत्यव्रती असून गर्व व अपवित्रता यांपासून मुक्त असतात, जे इतरांच्या मालिन्याचा नाश करणारे, सत्योपदेश व विद्यादान यांच्याद्वारे संसारी माणसांची दु:खे दूर केल्याने सुभूषित असतात, वेदविहित कर्मांद्वारे परोपकार करण्यात गढून गेलेले असतात, ते पुरुष व त्या स्त्रियाही धन्य होत. म्हणून मुले आठ वर्षांची होताच मुलांना मुलांच्या व मुलींना मुलींच्या शाळेत घालावे. दुराचारी शिक्षक-शिक्षिकांकडून त्यांना शिक्षण न देवविता पूर्ण विद्यायुक्त आणि धार्मिक वृत्तीच्या स्त्री-पुरुष अध्यापकांकडूनच त्यांना शिक्षण मिळेल, असे बघावे. (पान ३४) १० महर्षी दयानंद काय म्हणाले ?