पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगणारे; आणि माता, पिता, आचार्य, विद्वान्, अतिथी, राजा, प्रजा, कुटुंब, भाऊ, बहिणी, नोकर, चाकर यांच्याशी कसे वागावे याचे उत्तम शिक्षण देणारे मंत्र, श्लोक, सूत्रे, गद्य,पद्य त्यांच्याकडून अर्थासहित तोंडपाठ करून घ्यावे. त्यायोगे मुले लबाड माणसांकडून फसविली जाणार नाहीत. विद्या व धर्माविरुद्ध भ्रमात गुरफटून टाकणाऱ्या सर्व गोष्टींचीही (उदा. भूतप्रेत, फलज्योतिष, मंत्र-तंत्र) माहिती त्यांना द्यावी. म्हणजे भूतप्रेतासारख्या खोट्या गोष्टींवर त्यांची अंधश्रद्धा बसणार नाही. (पान २७-२८) महर्षी दयानंद काय म्हणाले ?