पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यार्थप्रकाशातील वेचे आईवडिलांची कर्तव्ये आई-वडील व आचार्य (गुरू) हे तीन उत्तम शिक्षक असतात तेव्हाच माणूस ज्ञानवान बनतो. ज्याचे मातापिता धार्मिक, विद्वान् असतात ती मुले भाग्यशाली होत आणि ते कुळ धन्य होय. मुलांना आईकडून जेवढा उपदेश मिळतो व मुलांवर जेवढे उपकार होतात तेवढे इतर कोणाकडूनही होत नाहीत. आई जशी आपल्या मुलांवर प्रेम करते, त्यांचे कल्याण करू इच्छिते तसे इतर कोणी करत नाही. जी माता गर्भधारणेपासून मुलाची विद्या पूर्ण होईपर्यंत त्याला सुशील बनण्याचा उपदेश करते ती धन्य होय. (पान २६) मुलांचे प्राथमिक शिक्षण मातेने मुलांना नेहमी चांगली शिकवण द्यावी. म्हणजे ती सभ्य बनतील आणि वेडेवाकडे चाळे करणार नाहीत. मूल बोलू लागले की त्याची जीभ कोमल बनून स्पष्ट उच्चार करू शकेल असे उपाय आईने करावेत. ज्या वर्णाचे जे स्थान व प्रयत्न असेल ते तिने मुलांना नीट समजावून सांगावे. उदाहरणार्थ 'प' चे उगमस्थान ओठ असून दोन्ही ओठ जुळवून 'प' चा उच्चार कसा करायचा ते प्रयत्नपूर्वक शिकवावे. हस्व, दीर्घ, प्लुत (तीन मात्रांचा स्वर किंवा वर्ण) अक्षरांचे योग्य उच्चार कसे करावेत ते सांगावे. मधुर, गंभीर, सुंदर, स्वर; अक्षर, मात्रा, पद, वाक्य, संहिता, अवसान यांतील फरक त्यांच्या कानांना नीट समजला पाहिजे. मुले थोडी फार बोलू व समजू लागली की त्यांना सुंदर वाणीचा वापर; लहान, थोर, आदरणीय, माता, पिता, राजा, विद्वान् इत्यादींशी कसे बोलावे, कसे वागावे, त्यांच्याजवळ कसे बसावे वगैरे गोष्टी शिकवाव्यात. म्हणजे त्यांच्याकडून कोठेही अयोग्य आचरण होणार नाही आणि सर्वत्र त्यांची प्रतिष्ठा होईल. मुले जितेंद्रिय, विद्याप्रिय, सत्संगप्रिय बनतील असा प्रयत्न करावा. निष्कारण खेळणे, रडणे, हसणे, भांडणे, आनंद व दु:ख करणे, कोणत्याही पदार्थाची लालसा बाळगणे, ईर्ष्या व द्वेष करणे यांची सवय मुलांना लागणार नाही, असा प्रयत्न करावा. मुलगा किंवा मुलगी पाच वर्षांची होताच त्यांना देवनागरी अक्षरे शिकवावीत. अन्यदेशीय भाषांची अक्षरेही शिकवावीत. त्यानंतर विद्या, धर्म, परमेश्वर यांचा अर्थ महर्षी दयानंद काय म्हणाले ?