पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८) सत्य, ५९) ज्ञान, ६०) अनंत, ६१) अनादि, ६२) आनंद, ६३) सत् , (पान १९) ६४) चित्, ६५) नित्य, ६६) शुद्ध, ६७) बुद्ध, ६८) मुक्त, ६९) निराकार, ७०) निरंजन, ७१) गणपती, ७२) विश्वेश्वर, ७३) कूटस्थ,* (पान २०) ७४) देवी, ७५) शक्ती, ७६) श्री, ७७) लक्ष्मी, ७८) सरस्वती, ७९) सर्वशक्तिमान्, ८०) न्यायकारी, ८१) दयाळू, (पान २१) ८२) अद्वैत, ८३) निर्गुण, ८४) सगुण, ८५) अन्तर्यामी, ८६) धर्मराज, ८७) यम, ८८) भगवान, ८९) मनु, (पान २२) ९०) पुरुष, ९१) विश्वंभर, ९२) काल, ९३) शेष, ९४) आप्त, ९५) शंकर, ९६) महादेव, ९७) प्रिय, ९८) स्वयंभू, ९९) कवी, (पान २३) १००) शिव. (पान २४) ____ अशी परमेश्वराची ही शंभर नावे येथे लिहिली आहेत. परंतु याहून वेगळी अशी परमेश्वराची असंख्य नावे आहेत. कारण जसे परमेश्वराचे अनंत गुण, कर्म, स्वभाव आहेत तशी त्याची अनंत नावेही आहेत. त्यापैकी प्रत्येक गुण, कर्म व स्वभाव यांचे एक-एक नाव आहे. म्हणून मी ही जी नावे नमूद केली आहेत ती सागरातल्या थेंबासारखी आहेत. कारण वेदादि शास्त्रांमध्ये परमेश्वराचे असंख्य गुण, कर्म व स्वभाव वर्णिलेले आहेत. ते वाचल्यावर व शिकविल्यावर त्यांची माहिती मिळते; आणि जे लोक वेदादि शास्त्रे वाचतात त्यांनाच इतर पदार्थांचे ज्ञानही पूर्णपणे होऊ शकते. (पान २४)

  • ७३) स्वतः न बदलणारा सर्वांचा आधार

४ महर्षी दयानंद काय म्हणाले ?