पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या संकलनाच्या पहिल्या प्रकरणात अकराव्या समुल्लासातीलही एक उतारा निवडला आहे. परमेश्वराच्या अनेक गुणांची गुणांनुसार अनेक नावे आहेत. त्यापैकी एकेक नाव निवडून ते नाव परमेश्वराच्या ज्या गुणाचे आहे त्याचे आपण स्मरण करत जावे. त्या नावाचे स्मरण करत त्याला योग्य असे आपले वागणे बनवण्याचा प्रयत्न करत जावा. हेच परमेश्वराचे नामस्मरण आहे; असे महर्षी दयानंद म्हणतात. दयानंदांनी दिलेल्या १०० नावांच्या यादीत सत्य हे देखील परमेश्वराचे एक नाव आहे. सत्याचा अर्थ आपण समजून घ्यावा व त्या अर्थाचा कोणताही प्रकाश आपल्या वागण्यात दिसावा यासाठीच सत्यार्थप्रकाश हा ग्रंथ लिहिण्याचा खटाटोप महर्षी दयानंदांनी केला आहे, असे वाटते. (या व पुढील सर्व समुल्लासात पुढे कंसामध्ये दिलेले पान क्रमांक सत्यार्थप्रकाश, मराठी अनुवाद, आर्य समाज, पिंपरी, १९९०, मधील आहेत. सत्यार्थप्रकाशातील वेचे उद्धृत करण्यास मंत्री, आर्य समाज, पिंपरी यांनी अनुमती दिल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. या व पुढील सर्व समुल्लासांच्या सुरुवातीला दिलेली निवडीची भूमिका या पुस्तिकेच्या संकलकाची आहे. त्या मजकुरातही आर्य समाज, पिंपरीकडून आलेल्या सूचनांचा अधिकाधिक समावेश करावयाचा प्रयत्न केला आहे. जेथे संकलकाची व आर्य समाजाची भूमिका वेगवेगळी आहे, तेथे तसा निर्देश केला आहे.) सत्यार्थप्रकाशातील वेचे ईश्वराची शंभर नावे ___ समाजामध्ये अनेक लोकांच्या नावावरून त्यांच्या परिस्थितीची कल्पना येत नाही. उदाहरणार्थ, नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा' असे असते. परंतु परमेश्वराचे कोणतेही नाव निरर्थक नसते. परमेश्वराची सर्व नावे कोठे गुणदर्शक असतात, कोठे कर्मदर्शक तर कोठे त्याचा स्वभाव दर्शविणारी असतात. जसे ॐ खं ब्रह्म' मधील परमेश्वराची सर्व नावे यथार्थ आहेत. महर्षी दयानंद काय म्हणाले ?