पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साप्ताहिक हवन यांचा त्यांनी आग्रहाने पुरस्कार केला. या आचारधर्माने जणू त्यांनी या देशाच्या लोकांमध्ये संघटना-तत्त्वाचेच बीजारोपण केले.

 वेदांप्रमाणेच स्वामी दयानंदांनी इतर धर्मांच्या प्रमाणग्रंथांचाही अभ्यास केला. त्या ग्रंथांमधील असंख्य तर्कदोष त्यांनी दाखवून दिले. पाश्चात्त्य किंवा इतर कोणतीच संस्कृती वैदिक संस्कृतीहून श्रेष्ठ असू शकणार नाही हे त्यांनी समर्थपणे प्रतिपादन केले.

 स्वामी दयानंदांनी आर्यसमाज या संघटनेची स्थापना केली. त्यांनी हजारो अनुयायांना प्रेरणा दिली. त्यांच्या मृत्यूनंतरही या अनुयायांनी वैदिक आदर्शाचा प्रचार भारतात आणि विदेशात केला.

 दि. ३० ऑक्टोबर १८८३ या दिवशी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी स्वामी दयानंदांचे निर्वाण झाले.

---
महर्षी दयानंद काय म्हणाले?
सहा