पान:महमद पैगंबर.djvu/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ ...पाकिस्तानचे संकट सर्वच बाजूंनी नुकसान झाले ! हिंदूंचे नुकसान कसे व किती झाले हे पाहण्यासाठीं या निर्णयाचा आणखी थोडी छाननी करणे जरूर आहे. १६ ऑगस्ट १९३२ रोजी सिमल्याहून प्रसिद्ध करण्यांत आलेल्या या निर्णयापूर्वी सरकारने असे जाहीर करून ठेविले होते की, या निर्णयामुळे सर्वांचे सर्वतोपरी समाधान होणार नाही, हे सरकारला विदित आहे. हिंदूशिवाय इतर कोणाचेंहि या निर्णयामुळे नुकसान झाले नाहीं ! इतरांनी त्याविरुद्ध ओरडण्याचे कांहीं कारण नव्हतें ! पण, कांहीं धूर्त मुसलमान पुढा-यांनी जातिनिर्णय प्रसिद्ध झाल्यावर नक्राश्रु ढाळलेच ! जातिनिर्णयांत विचार केलेला आहे तो फक्त प्रांतांचाच केला आहे; आणि, असा विचार करून अल्पसंख्याकांच्या प्रश्नाची समाधानकारक रीतीनें वासलात लावणाच्या कोणाहि प्रामाणिक माणसाला ही गोष्ट सुचली पाहिजे कीं, मुसलमान, शीख, हिंदी खिस्ती, अँग्लो-इंडियन व युरोपियन यांचे स्वतंत्र मतदारसंघ प्रत्येकीं भिन्न भिन्न असे मान्य करून, हिंदूंना सर्वसाधारण मतदारसंघांत कोंबणे हे सर्वच प्रांतांत शक्य नाहीं. मतदारसंघांची ही फाळणी कोणत्या तत्त्वावर झाली, हेहि स्पष्ट नाहीं. धर्मभेदानुसार झाली म्हणावी तर पारशी लोक हिंदूंहून धर्मदृष्ट्या भिन्न असल्यामुळे, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे होता. त्यांना हिंदूंच्या बरोबर कोंबून टाकणे तर्कशुद्ध नव्हते. खिस्ती, अँग्लो-इंडियन व युरोपियन हे सगळे एकाच ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे, त्यांना तीन मतदारसंघ देऊन त्यांचे महत्त्व वाढविण्याचे कारण नव्हतें ! सर्व त-हेच फाऊन्टन पेन्स विकत मिळतात | वै। । रिपेअर केली जातात. । का ळे ब्र द र्स . फाऊन्टन पेन्सचे व्यापारी फरासखाना हौदानजीक, पुणे २.