पान:महमद पैगंबर.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) शक्य ते ग्रंथ देऊन मला मदत केली. स०प०कॉलेजच्या ग्रंथालयाचे व्यवस्थापक श्री०वि०म०कोल्हटकर व सदर कॉलेजच्या प्राध्यापक वर्गात मान्यता पावलेले माझे मित्र प्रा०रा०वि० ओतुरकर यांचीहि बहुमोल मदत मला झाली आहे. माझे तरुण मित्र देशभक्त वासुदेव बळवंत गोगटे वकील यांनी पुष्कळशा प्रकरणांची हस्तलिखिते वाचून मला कांहीं महत्त्वाच्या सूचनाहि केल्या. माझे दुसरे स्नेही श्री. मो. रा. ढमढेरे वकील यांनींहि एका प्रकरणाचे हस्तलिखित वाचून कांहीं सूचना केल्या. सर्व हस्तलिखित वाचून, त्याची काय • द्याच्या दृष्टीने तपासणी करून, ते मंजूर करण्याचे त्रासदायक काम महाराष्ट्राचे प्रसिद्ध पुढारी दे० भ० धर्मवीर अण्णासाहेब भोपटकर यांनी आनंदाने अंगावर घेतलें !. या सर्व सज्जनांच्या सौजन्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. श्री० भोपटकर यांनी वेळांत वेळ काढून प्रस्तावनेदाखल दोन शब्द लिहून दिले, त्यामुळे तर मला फार धन्यता वाटत आहे. | 'पाकिस्तान' या विषयावर एखादं तरी चांगले पुस्तक प्रत्येक हिंदी नागरिकाने वाचले पाहिजे असे डॉ० आंबेडकर यांनी आपल्या विद्वन्मान्य ग्रंथांत एके ठिकाणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. इंग्रजी न जाणणा-या महाराष्ट्रीय लोकांची या दृष्टीने कांहीं तरी सोय व्हावी या हेतूने मी हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे, पुस्तकांत जी इंग्रजी अवतरणे दिली आहेत त्यांचा विस्तृत मराठी गोषवारा बहुतेक सर्व ठिकाणी दिला आहे. पाकिस्तान या विषयाची कल्पना सामान्य महाराष्ट्रीय वाचकाला या पुस्तकामुळे करंतां आली तर माझा हेतु साध्य झाला, असे मी समजेन. यापर्ल ‘चांगलेपण' या पुस्तकांत असेल, असे मी मानीत नाहीं. ‘लोकसंग्रह' मुद्रणालयांतल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुस्तक तांतडीने मुद्रित करण्याच्या कामीं श्रम घेतले असल्यामुळे त्या सर्वाचेहि मी मनोभावे आभार मानतो. या पुस्तकांत जी कांहीं माहिती आढळेल ती लोकांकडून म्हणजेच इतर ग्रंथकारांकडून मिळविलेली आहे. त्या माहितीचे श्रेय मला घेता येणार नाहीं. फोडिलें भांडार । धन्याचा तो माल । मो तंव हमाल । भारवाही ॥ अशीच या माहितीच्या बाबतींत माझी स्थिति आहे. यापलीकडे फारसे कांहीं ग्रंथांत नाहीं असे कोणी म्हटले तरी मला त्याचा राग येणार नाहीं ! ग्रंथकार म्हणून