पान:महमद पैगंबर.djvu/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

অাশুনা বিলীন वेळापत्रकाचा वाघोबा मागे लागल्यावर पुस्तक लिहिणे व ते छापून प्रसिद्ध करणे ही कामें फार तापदायक ठरतात. 'पाकिस्तानचे संकट या पुस्तकाचे काम तरी अशा रीतीने तापदायक भासू नये, अशी तीव्र इच्छा. मनांत होती; पण, ती इच्छा सफल होऊ शकली नाही, हा योगायोगच होय ! पुस्तकाची केवळ मुद्रिते पाहून, तयार पुस्तक हाती येण्याआधीच, मला पुण्याबाहेर जावे लागत आहे. तथापि, ठरल्या दिवशी पुस्तकाच्या प्रती वाचकांना मिळतील, असा विश्वास मला वाटत आहे. घाईत काम पुरे करावे लागले असल्यामुळे, मुद्रणाचे दोष टाळण्याच्या बाबतींत अवश्य तो कांटेकोरपणा मला दाखवितां आला नाही, हे मी कबूल करतो; पण, सर्व परिस्थिति लक्षांत घेऊन जे करणे शक्य होते ते मी मनोभावे केले आहे, असेहि समाधान मला वाटत आहे. | डॉ० आंबेडकर यांचा ग्रंथ मी गेल्या मार्च महिन्यांत वाचला. या विषयावर आपल्यालाहि कांहीं म्हणता येईल, असे मला तेव्हां वाटले. ते म्हणण्याचा योग गेल्या श्रीगणेशोत्सवाच्या निमित्ताने आला. मुंबई, बडोदे, अहमदाबाद वगैरे ठिकाणी मी जी व्याख्याने या विषयावर दिली ती लोकांना आवडली, असे दिसले. तथापि, अनेक कारणांमुळे, विचार पुस्तकरूपाने मांडण्याची मनाची तयारी होईना. शेवटीं, नोव्हेंबर १०-१२ च्या सुमारास मनाने. असे ठरविलें कीं, एकदां हे पुस्तक लिहून पुरे करावयाचेच ! तो संकल्प परमेश्वरकृपेने आज पुरा होत असल्यामुळे, मला स्वाभाविकपणेच संतोष वाटत आहे. माझ्या वृत्तपत्रीय लेखनाचा आपलेपणाने स्वीकार करून महाराष्ट्राने मजवर उपकार केले आहेत. या पुस्तकाचाहि महाराष्ट्र आपलेपणाने स्वीकार करील, असा भरंवसा मला वाटत आहे. | पुस्तक लिहिण्याचे काम सुरू असतांना मला अनेकांची मदत झाली. केसरी-मराठा संस्थेच्या ग्रंथालयाचे व्यवस्थापक श्री० दि० वि०काळे यांनी