पान:महमद पैगंबर.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९) समाजापुढे यावे ही भूमिकाच या लेखनांत नाहीं ! एका विषयाचे एका विशिष्ट दृष्टीने विवेचन करावे इतकीच मर्यादित इच्छा या लेखनाला कारणीभूत झालेली आहे ! वाचकांनी अशा मर्यादित अपेक्षेनेच पुस्तकाकडे पाहावे; म्हणजे, मी त्यांची निराशा केली असे त्यांना वाटणार नाहीं ! | हिंदूंनीं राज्यघटनेची कोणती तत्त्वे मान्य करावीं में एक प्रकरण पुस्तकांत घालावे असे मनांत होते; पण, पुस्तकाची पाने संकल्पाहून पुष्कळच वाढल्यामुळे व पुस्तक पुरे करून पुण्याबाहेर निघण्याची निकड लागल्यामुळे, तो विषय वगळावा लागला. एकाद्या स्वतंत्र पुस्तकाच्या रूपाने मांडण्याच्या योग्यतेचा ‘हिंदुसंघटन' हा विषय फार थोड्या मर्यादेत कोंबावा लागला, हेहि माझ्या ध्यानात आले आहे; पण, प्राप्त परिस्थितीत अधिक विस्ताराने लिहिणे शक्य नव्हते. इतकेच तूर्त सांगून वाचकांची रजा घेतों. । पुणे, दिनांक २३।१२।१९४१ शि० ल० करदीकर