पान:महमद पैगंबर.djvu/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ५ वें । प्रक मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास टप्पा तिसरा : १९२० ते १९४१ । कै० लोकमान्य टिळकांविषयींची एक आख्यायिका मोठी सूचक आहे. होमरूल चळवळीला ऐन भर आला होता व टिळकांनी ठिकठिकाणच्या ठळक पुढा-यांना पुण्यास बोलावून घेतले होते. संध्याकाळच्या सुमारास ही मंडळी कांहीं महत्त्वाचे काम करीत होती; इतक्यांत, बैठकीच्या बाजूच्या सज्ज्यांत एक संन्याशी येऊन उभा ठाकला. ब-याच मंडळींचे लक्ष कामांतून निघालें व ती मंडळी बैठक सोडून, आदरमिश्रित जिज्ञासेनें, त्या संन्याशापाशींच बोलत उभी राहली ! कहीं वेळाने संन्याशी निघून गेला. मंडळी परत बैठकीत आल्यावर टिळक जरा रागानेच म्हणाले : माझ्या डोक्यावर शेंडीच्या दोन बटा शिल्लक आहेत; एवढ्यामुळे मी संन्याशी ठरत नाहीं कीं काय ? 1. टिळकांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या प्रश्नांतच आहे. वृत्तीने संन्याशी नसून, मनुष्य नुसता वेषाने संन्याशी असला तरीहि, हिंदुसमाजांतलीं मोठमोठी माणसे त्याच्याकडे आकषली जातात. क्षीरसमुद्राने श्रीविष्णूचा पीतांबर पाहून त्याला आपली मुलगी दिली; पण, शंकर दिगंबर असल्याचे दिसतांच त्याने हलाहल विष त्याच्या हवाली केले. हिंदुस्थानांतल्या लोकसमुद्राची वृत्ति याच्या अगदी उलट आहे ! दिगंबरत्वावर भाळून तो हवी ती वस्तु दिगंबराला अर्पण करण्याला प्रवृत्त होईल; पीतांबराला तो हलाहल देईल, असेच केवळ नव्हे; पण, पीतांबरदर्शनाने त्याची सर्वस्वसमर्पणबुद्धि जागृत होणार नाही, हे मात्र खरें ! १९२० सालीं गांधीजींचा उदय हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर झाला; तेव्हां हिंदुसमाजाच्या मानसिक घडणींतला हा विशेष त्यांना पुष्कळच उपयोगी पडला. पारतंत्र्यांत पिचत राहण्याला कंटाळलेल्या हिंदुसमाजाला एका वर्षांत स्वराज्यप्राप्तीची घोषणा करणारा हा संन्याशी ईश्वरी अव