पान:महमद पैगंबर.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास तारच भासला ! संन्यासप्रवण मनोवृत्तीला सहज पटणारा असहकारयोग, भूतदयेच्या धर्माचा उद्धार करू पाहणारा अहिंसावाद वगैरे गोष्टींचा पुकारा होऊ लागतांच हिंदुसमाजाच्या झुंडीच्या झुंडी गांधी गोटात गोळा होऊ लागल्या. हिंदु-मुसलमानांच्या ऐक्याचा गांधीजींना ध्यास लागून राहिला; आणि, पहिले कांहीं दिवस या ऐक्याचा देखावाहि चांगलाच टिकला. पण, मुसलमान समाज या देखाव्यांत सामील झाला होता तो मुसलमान म्हणून त्याचे जे गा-हाणे होते त्याला वाचा फुटावी म्हणून सामील झाला होता ! हे गा-हाणे संपतांच मुसलमान समाज जो दूर सटकला तो आतां कांहीं केल्या गांधीजींच्या हाती लागत नाहीं ! ‘लभेत वा प्रार्थयिता न वा श्रियम् । श्रिया दुरापः कथमीप्सितो. भवेत् हा श्रीसंपादनाच्या बाबतींत येणारा अनुभव मुसलमानांशीं ऐक्य जमविण्याच्या बाबतींत आल्यामुळे, गांधीजींनी अलीकडे या बाबतींत जाहीरपणे तरी बोलण्याचे प्रायः सोडूनच दिले आहे. . १९१९ साली हिंदु-मुसलमान समाजांची एकी झाल्याचा भास झाला. त्याची खरीं कारणे कोणती हे पुष्कळांच्या लक्षांत नसते. युद्ध संपण्याच्या वेळीं युरोपांत ज्या घडामोडी झाल्या त्या समजल्याविना हीं कारणे लक्षांतहि येणार नाहींत. १९१९ सालीं सेव्हर्सच्या तहाचा मसुदा प्रसिद्ध झाला व से तुर्कस्थानच्या भवितव्याबद्दल सारें इस्लामी जग साशंक बनले. रशियांत तत्पूर्वी सुरू झालेल्या बोल्शेव्हिझमची झळ अफगाणिस्थानपर्यंत पोचण्याची लक्षणे दिसू लागल्यामुळे, हिंदुस्थान सरकारने सरहद्दीबाबतच्या धोरणांत व अफगाणिस्थानविषयक धोरणांत कडकपणा धारण केला. विजयी झालेली युरोपमधील राष्ट्रे व अमेरिका इस्लामी राष्ट्रांबद्दल तिरस्कार बाळगीत आहेत असे वृत्तपत्रीय लेखांवरून दिसू लागले. या सर्व बनावांमुळे सारें इस्लामी जग प्रक्षुब्ध झाले. या प्रक्षोभापासून भारतीय मुसलमान अलिप्त राहू शकले नाहीत व त्यामुळे खिलाफतीची चळवळ हिंदुस्थानांत सुरू झाली व बळावली ! मुसलमानांच्या या असंतुष्ट वृत्तीचा फायदा घेऊन भारतीय स्वातंत्र्याची चळवळ पुढे रेटणारा टिळकांसारखा मुत्सद्दी असता तर त्याने, स्वतःच्या